.......अन् "तो" शेतकरी मगराच्या जबड्यातून पडला बाहेर. #Crocodile

Bhairav Diwase
जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल.

(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सावली तालुक्यातील हरांबा येथे मगराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली आहे. महादेव तुकाराम भोयर वय ३६ वर्षे असून सदर व्यक्ती गुरे चारण्यासाठी गेला होता. गवत वाढून असल्याने मगर असल्याची जाणीव झाली नाही आणि त्यांनी दुपारच्या सुमारास बैल धुण्यासाठी नाल्यात उतरले असता हा प्रकार घडला. त्यामूळे गावातील अनेक लोक घटनास्थळी गर्दी केली होती. #Crocodile
वैनगंगा नदीला पूर आल्याने नदीचा प्रवाह वाढत आहे आणि कढोली येथील नाल्यापर्यंत पाणी आल्याने त्याच पाण्यात मगर आले होते. सदर व्यक्ती जखमी असून त्याला लोंढोली येथील दवाखाण्यात भरती करण्यात आले होते. त्याच्या मानेला जबर जखम झाल्याने त्याला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले आहे. #Adharnewsnetwork