Top News

नागुलवार सरांनी चमकावले विद्यार्थ्यांचं आर्थिक भविष्य. #NMMS


नऊ विद्यार्थी NMMS गुणवत्ता यादीत.

पोंभुर्णा:- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना (NMMS) ची अंतिम गुणवत्ता यादी 18ऑगस्ट ला प्रसिद्ध झाली. यामध्ये 8 व्या वर्गातील राष्ट्रमाता विद्यालय देवाळा खुर्द येथील पाच तर महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय चिरोली येथील चार असे तब्बल नऊ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या शिष्यवृत्तीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना सलग चार वर्ष बारा हजार प्रती वर्ष अशी तब्बल 48 हजार शिष्यावृत्ती साठी पात्र झालेले आहेत. #NMMS
अंजली भडके, सानिका बुरांडे , सानिया पडोळे, श्रुती टेकाम, भूषण बिल्लरवार, लिशा चूनारकर, पियुष मंदाडे, गायत्री वाढई, साहिल निकुरे. या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती साठी निवड झाली आहे. या यशाचं श्रेय विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडील व व गुरुजनांना दिलेला आहे. अंकुश नागुलवार सरांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. #Adharnewsnetwork

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने