💻

💻

भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर महानगर तर्फे स्व. अक्षय खांडेकर यांना श्रद्धांजली अर्पण. #Chandrapur


जनसेवेसाठी धडपड करणारा युवा नेता हरपला:- विशाल निंबाळकर.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- सर्वप्रथम स्व. अक्षयच्या फोटोला माल्यार्पण व पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. खांडेकर परिवाराचा असलेला जनसेवेचा वारसा अक्षय हा प्रामाणिक पणे सांभाळत होता. गरजू लोकांची सेवा करत करत त्याने आपले नाव सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण केलं होत. अशी भावना भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी व्यक्त केली. #Chandrapur
   
          तो उत्तम असा एक कार्यकर्ता होता लोकांच्या समस्या कश्या मार्गी लागतील तो नेहमी त्यासाठी प्रयत्नशील होता अशी भावना भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी व्यक्त केली. #Adharnewsnetwork
       
सोबतच जिल्हा महामंत्री ब्रिजभुषण पाझारे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष कुणाल गुंडावार यांनी सुद्धा अक्षय च्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाला भाजयुमो जिल्हा महामंत्री प्रज्वलंत कडू, प्रमोद क्षिरसागर, सर्व भाजयुमो पदाधिकारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन भाजयुमो जिल्हा सचिव सत्यम गाणार यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत