सुधारणावादी विचार आत्मसात करा- पुंडलिक उराडे #Program

Bhairav Diwase
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे सद्भभावना दिवस व अक्षय उर्जा दिन संपन्न.

वृक्षारोपण व देशभक्तीपर एकल नृत्य स्पर्धेचे आयोजन.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- कुठल्याही चांगल्या गोष्टी करायच्या असल्या तर मानवाने नेहमी सुधारणावादी विचार आत्मसात केले पाहिजे. नैसर्गिक साधन संपत्ती व आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ घालत देशाची प्रगतीकरिता हातभार लावला पाहिजे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष पुंडलिक उराडे, भारत स्वाभिमान संघटन तालुका प्रभारी राजुरा यांनी याप्रसंगी केले.#Adharnewsnetwork


स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी जयंती सद्भभावना दिवस म्हणून साजरी करण्यात येते. अक्षय उर्जा दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष तसेच नेफडोच्या पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस निमित्य वृक्षारोपण व देशभक्तीपर एकल नृत्य स्पर्धा स्थानिक सोनिया गांधी कॉन्व्हेंट येथे आयोजित करण्यात आली होती. 


या कार्यक्रमाचे उद्घघाटक म्हणून केवाराम डांगे मुख्याध्यापक, शिवाजी हायस्कूल राजुरा यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून शबनम अन्सारी मुख्याध्यापिका, सोनिया गांधी कॉन्व्हेंट राजुरा, रफत शेख उप मुख्याध्यापिका, सोनिया गांधी कॉन्व्हेंट राजुरा, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे बादल बेले नागपूर विभाग सचिव, विजय जांभुळकर, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, संतोष देरकर, तालुका अध्यक्ष, रजनी शर्मा तालुका उपाध्यक्ष, आशिष करमरकर, तालुका संघटक तथा अध्यक्ष छावा फाउंडेशन राजुरा, कृतिका सोनटक्के, एकल नृत्य स्पर्धेचे परीक्षक कल्याणी मोहरील, राधा विरमलवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिपप्रज्वलन व वृक्ष पूजन करण्यात आले.

 उपस्थित मान्यवरांचे स्वागत ललिता खंडाळे यांनी तयार केलेल्या कुंडीतील रोपांद्वारे करण्यात आले. नेफडोचे तालुका अध्यक्ष संतोष देरकर, उपाध्यक्ष रजनी शर्मा व तालुका संघटक आशिष करमरकर यांच्या वाढदिवसानिमित्त साईनगर येथे तीस नारळाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच देशभक्तीपर एकल नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राची देरकर, द्वितीय क्रमांक आचल मौर्य, तृतीय क्रमांक साक्षी पेंदोर, प्रोत्साहनपर बक्षीस अनुष्का बनसोड, वेदांती चिडे, सानिया शेख, तर सहभागी बक्षीस आकांक्षा व्यवहारे, सांज कुमरे, वैदेही कुलकर्णी, श्रेया बोबडे, अर्चना सिंग, स्वाती चौधरी, सलोनी चौधरी, प्रगती मिश्रा यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह भेट देण्यात आले. एकल नृत्य स्पर्धेमध्ये आदर्श हायस्कूल, राजुरा, शिवाजी हायस्कूल राजुरा, सोनिया गांधी कॉन्व्हेंट राजुरा, द न्यू एरा इंग्लिश स्कुल,राजुरा स्टेला मॉरिस कॉन्व्हेंट बामनवाडा राजुरा, इन्फंट् जिजस पब्लिक स्कूल राजुरा, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा, या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन वर्षा कोयचाळे यांनी केले. एकल नृत्य स्पर्धेचे संचालन वज्रमाला बतकमवार यांनी केले. प्रास्ताविक कृतिका सोनटक्के यांनी तर आभार पूर्वा देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था राजुरा शाखा व छावा फाउंडेशन राजुराच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.#Program