जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे १७ वर्षीय युवतीचा मृत्यू. #Death

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील कोंडुजी अनमुलवार यांच्या सानिका या मुलीला रक्ताची कमतरता असल्याने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी आणण्यात आले होते. तेथील कर्मचाऱ्यांनी तिला दाखल करून घेतले. वार्डात बेडसुद्धा देण्यात आला. #Death #Chandrapur

मात्र, तासभराचा कालावधी लोटूनही डॉक्टर तेथे आले नाही. आणि उपचाराअभावी त्या १७ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. २१) दुपारच्या सुमारास चंद्रपुर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली. सानिका कोंडुजी अनमुलवार असे मृत मुलीचे नाव आहे. या प्रकाराने कुटुंबीयांनी रुग्णालयातील सुविधेविरोधात संताप व्यक्त करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.#adharnewsnetwork