Top News

शिवसेना आणि कॉंग्रेसच्या मंत्र्यांमध्ये रंगला बॅडमिंटनचा सामना. #Badminton

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे मंत्र्यांचे दौरेही वाढले आहे. आज गडचिरोलीचा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एकत्र दौरा केला. #Badminton
यावेळी गडचिरोलीतल्या बॅडमिंटन कोर्टवर एकनाथ शिंदे आणि राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात बॅडमिंटनचा चांगलाच सामना रंगला होता. #Adharnewsnetwork
दोन्ही मंत्र्यांनी रॅकेट हातात घेऊन आपल्यातल्या खेळाडू वृत्तीचे दर्शन घडवले, नंतर दोन्ही मंत्र्यांनी येथील जिममध्ये व्यायामही केलं. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध नसल्याने अतिदुर्गम भागात अनेकांचे जीव गेले आहेत. तर अतिदुर्गम भागात लसीकरण करण्याचे मोठे आव्हान असून त्या गावापर्यंत पोहचण्यासाठी नव्या वाहनांची आवश्यकता होती.
या सगळ्या गरजा पाहुन जिल्ह्यासाठी आज 47 वाहनांचे लोकापर्ण गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यात 9 रुग्णवाहिकासह लसीकरणासाठी 24 तर पोलीस विभागासाठी ९ वाहनांचा समावेश होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने