तीर्थक्षेत्र गायमुख देवस्थानसाठी विकासनिधी मंजुर. Fund

Bhairav Diwase
जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या प्रयत्नांना यश.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
नागभीड:- तालुक्यातील बाळापुर रेल्वे स्टेशनजवळील गायमुख देवस्थान हे भाविकांचे श्रध्दास्थान आहे. येथे असलेल्या गोमुखातुन अखंड सुरु असलेले पाणी अनेक भाविक तीर्थ म्हणुन नेत असतात. या ठिकाणी स्थापित हनुमान मंदिर नवस फेडण्यासाठी प्रसिध्द आहे.
गायमुख देवस्थान येथे दर मंकरसंक्रातीला मोठी यात्रा भरत असुन वर्षभर येथे भाविकांची रेलचेल असते. जंगलालगत डोंगराच्या कुशीत वसलेल्या या कुंडाच्या पाण्यात आंघोळीसाठी अनेकजण येत असतात. स्रियांसाठी सुध्दा वेगळ्या कुंडाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. निसर्गसौंदर्याने व्याप्त या ठिकाणी पर्यटकांचीही मोठी उपस्थिती असते. या तीर्थक्षेत्रावर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेत या विभागाचे तत्कालीन आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी याला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवुन दिला.#Adharnewsnetwork


       या क्षेत्राचे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी तीर्थक्षेत्र विकास निधीतुन प्रवेशद्वारापर्यंत पोचमार्गासाठी सिमेंट कॅांक्रिट रस्त्याचे कामासाठी निधी मंजुर केला आहे. या कामाचे भुमीपुजन बाळापुर बुज. ग्रा.पं. चे सरपंच प्रशांत कामडी यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी माजी सरपंच धनराज बावणकर , भोजराज नवघडे , विनोद गिरडकर , ग्रा.पं. सदस्य तसेच भाविक यांची उपस्थिती होती . या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी यापुढेही निधी मंजुर करणार असल्याची माहिती जि.प. सदस्य संजय गजपुरे यांनी दिली आहे.#Fund