Top News

पर्यटनाच्या चष्म्यातून गडचिरोली. #Gadchiroli




आज गडचिरोली चा नाव घेतल्यावर विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात लोक घाबरतात, प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतात आणि डोळ्यासमोर चित्र दिसतो तो नक्षलग्रस्त, अतिदुर्गम व मागास भागाचा. जिल्ह्याचा हा वास्तव इतिहास असल्याने तो नाकारता येणार नाही. पण आज दृश्य बदलतोय गरज आहे फक्त आपला दृष्टीकोन बदलून पाहण्याची. गडचिरोली जिल्हा हा येथील नैसर्गिक सोंदर्याने भरभरून नटलेला आहे.

कोरोना च्या महामारीत प्रत्येक माणसाला आयुष्य कसं जगायचं बऱ्या पैकी समजलं आहे, त्यामुळे आपल्या प्राथमिक गरजा भागवून जो काही पैसा आहे तो फिरणे व आयुष्याच्या आनंद घेण्यात खर्च करतो. त्यामुळे बदलत्या जीवनशैलीत पर्यटनात वाढ होतांना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर स्थानिक पर्यटनाला विषेश वाव मिळाल्याचे दिसत आहे. याच उत्तम उदाहरण म्हणजे चामोर्शी तालुक्यातील "मुतनूर" ठिकाण गडचिरोली मुख्यालयापासून साधारणतः 30 ते 35 किमी अंतरावर आहे. जिल्ह्यातील फक्त स्थानिक पर्यटकच नाही तर शेजारील चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा सारख्या जिल्ह्यातून देखील अनेक पर्यटक इथे भेटी देत असतात. साधारणतः 400 ते 500 तरी पर्यटक प्रति दिवस या ठिकाणी येतात. आणि फक्त मुतनूर म्हणूनच नाही तर अशी अनेक ठिकाणे जिल्ह्यात उदयास येत आहे. आज पर्यंत नक्षलींचे माहेर घर म्हणून ओळख असणारे अहेरी तालुक्यातील "कमलापूर" हतींचे माहेर घर म्हणून ओळखायला येऊ लागले आहे. आज ऐतिहासिक दृष्टीने विचार केल्यास वैरागड आणि टिपागड चा किल्ला डोळ्यासमोर येतो. धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटन करतो म्हणल्यास प्रसिध्द असे विदर्भातील काशी म्हनून ओळख असणारे मार्कंडा, चपराळ, वैरागड, कुरखेडा(अरत तोंडी महादेव), सिरोंचा (सोमनूर) अशी अनके ठिकाणे पाहायला मिळतात. तर भौगोलिक दृष्टीने ने पर्यटनाचा विचार करता डायनसोर चे अस्तित्व सांगणारे प्रसिद्ध असे सिरोंचा येथील वडधम जीवाश्म पार्क , सिरोंचा येथील गोदावरी आणि प्राणहिता व समोर चालून गोदावरी आणि इंद्रावती नदी संगम, चपराळा येथील वर्धा व वैनगंगा नदी संगम आणि तिथून उगम होणारी प्राणहिता नदी याशिवाय भामरागड येथील पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती नदी संगम अशी अनेक ठिकाणे जिल्ह्यात पाहायला मिळतील.
इतकेच नाही तर गडचिरोली जिल्ह्याची ओळख "जंगलाचा जिल्हा" म्हणून आहे, त्यामुळे निसर्ग पर्यटनाला इथे तर काही कमीच नाही त्याची विशेष ओळख दाखविणारा आणि वनसंपत्ती चे विशेष महत्त्व सांगणारे 'वन वैभव आलापल्ली' सुद्धा इथेच पहायला मिळते शिवाय जिल्ह्यातील प्रत्येक रस्ता आणि त्याच्या दोन्ही कडेला असलेली लांब लांब उंचच उंच विविध प्रजातीचे झाडं हे फक्त मनाला प्रसन्नच करून जात नाही तर पृथ्वीवरच्या स्वर्गात असल्याचा आभास देखील करून देतात. #Gadchiroli
अहेरी तालुक्यात असलेला व्यंकटापुर येथील पाण्याचा कुंड तर विशेषच म्हणावं लागेल जिमीनीतून बुडबुड्याच्या माध्यमातून निघणारे झरे जस जसे दोन हाताची टाळी वाजते तसे अधिक आक्रमक पध्दतीने वर येतात. #Adharnewsnetwork याव्यतिरिक्त याच्याच जवळ असलेला प्राणहिता नदी काठावर असलेला देवलमारी येथील धबधबा अतिशय सुंदर व देखणा ठिकाण. त्याचप्रमाणे सिरोंचा तालुक्यातीलच जंगलाच्या मधोमध असलेला परसेवाडा येथील धबधबा, चामोर्शी तालुक्यातील चपराळा अभयारण्य, चीचडोह ब्यारेज, दीना प्रकल्प, भामरागड तालुक्यातील लोकबिरादरी प्रकल्प अशी अनेक पर्यटन स्थळे जिल्ह्यात आहेत. पण दुर्देव असे इतके सुंदर ठिकाण जिल्ह्यातीलच अनेक लोकांना माहिती नाहीत किंवा त्याचा हवा त्या प्रमाणात प्रचार प्रसार झालेला नाही. 
आज स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने मिळून ह्या सर्व क्षेत्रांचा प्रचार प्रसार व वीकास करणे देखील तितकाच गरेजेचा आहे. जिल्ह्यात आज वेगवेगळ्या जमातीचे लोक आहेत मराठी, माडिया, गोंड, तेलगू, बंगाली आदीवासी सगळ्यांची संस्कृती वेगवेगळी, सगळ्यांचा खानपान, सणउत्सव वेगवेगळे, तरीही आज सर्व लोक गुण्यागोविंदाने इथे वास्तव करतात हे सुद्धा एक विशेषच आहे गडचिरोली म्हणजे जणू "मिनी भारतच". सद्या परिस्थितीत "मेडिकल टुरिजम" ही संकल्पना अस्तिवात येत आहे त्या करिता देखील आपला जिल्हा उत्तम ठिकाण बनू शकते याचा उत्तम उदाहरण म्हणजे कोविड च्या काळात इतर जिल्ह्याच्या तुलनेत जिल्हा सरकारी रुग्णालयांनी बजावलेली भूमिका त्यांची उत्तम व्यवस्था व नियोजन खरच अभिमानस्पद होते.
येणाऱ्या काळात पर्यटन क्षेत्र हा सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारा क्षेत्र ठरू शकतो आज बाहेरचा पर्यटक आपल्या जिल्ह्यात आल्यास त्याला राहायला चांगले हॉटेल, फिरायला वाहन ,मार्गदर्शन करण्यासाठी उत्तम गाईड अश्या अनेक गोष्टीची गरज पडते आणि हीच गरज आपल्या साठी रोजगार निर्माण करून देईल आणि त्यामुळेच पर्यटन रोजगरातून जिल्ह्याचा नैसर्गिक सोंदर्य टिकून राहील व त्याची अस्मिता सुध्दा आपल्याला जपता येईल.

✍️अनुप कोहळे, राजनगट्टा ता.चामोर्शी.
MA प्रथम वर्ष (Travel अँड Tourisam)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने