Click Here...👇👇👇

विवेकानंद कला व वाणिज्य महाविद्यालय येथील शारीरिक शिक्षिका प्रा संगीता बांबोडे यांना राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर. #Award

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावतीः नाशिकच्या क्रीडा संस्कृती फाउंडेशन तर्फे क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या क्रीडा मार्गदर्शकांना दरवर्षी राष्ट्रीय व राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या क्रीडा मार्गदर्शिका, भद्रावती येथील विवेकानंद कला व वाणिज्य महाविद्यालय भद्रावती शारीरिक शिक्षिका प्रा. संगीता बांबोडे यांचा राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सहभाग व मार्गदर्शन याची दखल घेत क्रीडा संस्कृती फाउंडेशन नाशिक तर्फे २०२१ चा राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर आहे.#Adharnewsnetwork
सदर पुरस्कार नाशिक येथे दिनांक २९ ऑगस्ट, राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून प्रधान करण्यात येईल, अशी माहिती फाऊंडेशनचे सरचिटणीस उदय खरे यांनी दिली आहे. प्रा संगीता बांबोडे यांना राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तिचे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट),वरोरा चे अध्यक्ष ऍड. मोरेश्वरराव टेमुर्डे, सचिव अमन टेमुर्डे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच अकॅदमी ऑफ फिजिकल एज्युकेशन नागपुर चे अध्यक्ष डॉ. अनिलकुमार करवंदे, गोंडवाना विद्यापीठ शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभाग च्या संचालिका डॉ. अनिता लोखंडे, महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे महासचिव डॉ. राकेश तिवारी, चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रेमचंद, अथलेटिक्स संघटना चंद्रपूर चे अध्यक्ष दिलीप जयस्वाल, सचिव सुरेश अडपेवार, सायकलिंग संघटनेचे अध्यक्ष विनोद यादव, चंद्रपूर जिल्हा फेंन्सीग (तलवारबाजी) संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिलीप बगडे, डॉ. यशवंत घुमे प्रा. रसिकलाल वारकरी, डॉ. अनीस खान, दिलीप मोडक, विजय लांबट, ऍड. मिलिंद रायपुरे, किशोर चिंचोलकर, विजय डोबाळे, डॉ अमित प्रेमचंद, संतोष निंबाळकर, युवराज भारती, सुनिता खंडाळकर, संघमित्रा बांबोडे, वर्षा कोयचाडे, शितल मांडवकर, प्रफुल पतंगे, आचल तेलंग, प्रियंका मांढरे, शिवानी घाटे,अलोका विश्वास यांनी प्रा. संगीता बांबोडे यांच्या सन्माना बाबत अभिनंदन केले व सहर्ष शुभेच्छा दिल्या.#Award