Top News

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने जिवती येथे शहीद विर बाबुराव शेडमाके चौकात रास्ता रोको आंदोलन. #Movement #Jivati


आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती

१) स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी .
२) कोरोना काळातील विजबिल सरकारने भरावे यासाठी.
३) नोकर भरती नव्याने घेण्यात यावी यासाठी.
४) जिवती येथे स्टेट बँक सुरू करण्यात यावी.
५) जिवती तालुक्यातील भूमिहिन शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीचे पट्टे देण्यात यावे.
६) जिवती तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य उप केंद्राला स्वतंत्र रुग्णवाहिका देण्यात यावी.
७) जिवती येथील बंजारा भवनातील वाचनालय सुरू करावे.
८) तीन पिढ्यांची अट रद्द करून शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे वाटप करण्यात यावे.
९) सर्प दंशाने मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांचा मोबदला देण्यात यावा या प्रमुख मागण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुदामभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलनाचा आयोजन केले होते. या आंदोलनात विदर्भाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. #Movement #Jivati
विदर्भवाद्यांनी या रास्ता रोको आंदोलनात भाग घेतला आणि चक्का जाम करून सरकारच्या विरोधात नारेबाजी केली त्यावेळेस शेकडो कार्यकर्त्यांना जिवती पोलिसांतर्फे अटक केले नंतर सोडण्यात आले. आंदोलनाच्या दरम्यान विदर्भवाद्यांनी रोड वर बसून रोड जाम केले आणि घोषणा केल्या विदर्भ आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा वेगळा विदर्भ झालंच पाहिजे २०० युनिट वीज बील माफ केलेच पाहिजे ,२०० युनिट नंतरचे वीज दर निम्मे करा , कृषिपंप च्या लोडशेडिंग ला बंद केले पाहिजे. अशा तराची नारेबाजी करत रोड वर बसले आणि विदर्भवाद्यांनी सडक जाम केले महाराष्ट्रात देशातून सर्वात महाग वीज आहे. याच्या वर, महावितरण २० टक्के वृद्धी चा प्रस्ताव करत आहे आणि विदर्भाच्या लोकांवर ६०,००० करोड रुपयांची वृद्धी करणार. आता ह्या अन्यायपूर्ण टैरीफ वृद्धी ला सहन नाही करणार. विदर्भाच्या सर्वच लोकांना २०० युनिट पर्यन्त वीज बिल फ्री केलेच पाहिजे आणि नंतरचा वीज दर निम्मे केले पाहिजे. वीज आकार,कंडकशन टॅक्स, सरचार्ज दिले पाहिजे. आम्ही नाही भरणार आणि हा आंदोलन तो पर्यंत करणार जोपर्यंत वीज बिल दर निम्मा नाही होणार. आणि स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होईल तोपर्यंत, हा फैसला विदर्भवाद्यांनी केला आहे. आणि अशाप्रकारचे आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समिती द्वारे सुरू झाले आहे, त्यातलाच हा आजचा रास्ता रोको चक्का जाम आंदोलन करण्यात आल विदर्भात वीज तयात करण्याची लागत २.५० रुपये प्रति युनिट आहे. महावितरण जनतेकडून १०० युनिटसाठी ५.१० ,२०० युनिटसाठी ६.७५ आणि ५०० युनिटसाठी ११.५७ हे एकत्र करतात. #Adharnewsnetwork
तरी पण महावितरणला ५३,००० कोटींचा नुकसान कसा होतो. या नुकसान भरपाई साठी पुन्हा विदर्भातील वीज ग्राहकांकडून ६०.००० करोड रुपयांची किंमत वृद्धी प्रस्ताव देऊन लुटत आहे, विदर्भ राज्य आंदोलन समिती या लूट चा विरोध करत आहे , आणि सरकारनि या मागण्यांची तुरंत स्विकार करावी, नाहीतर आंदोलन तेज होऊन जाणार असा इशारा सुदाम राठोड जिल्हाध्यक्ष चंद्रपूर युवा आघाडी यांनी केला आहे.
आंदोलनात युवा आघाडीचे जिवती तालुका अध्यक्ष युवा आघाडी अरविंद चव्हाण, वि रा आ स तालुकाध्यक्ष सुनील राठोड, शहर अध्यक्ष विनोद पवार , युवा आघाडी सोशल मीडिया प्रमुख चंद्रपूर विशाल राठोड, शेतकरी संघटनेचे निलकंठराव कोरांगे,देविदास वारे,सायसराव कुंडगिर, शाबीर जहागीरदार, इस्माईल सय्यद,गणेश कदम,उद्धव गोतावळे,त्र्यंबक सूर्यवंशी सोबतच शेकडोंच्या संख्येने विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने