जाहिरात... Advertisement... विज्ञापन

बल्लारपूर खुनाच्या घटनेने हैराण. #Murder #Ballarpur


30 वर्षीय तरुणाची हत्या; तर 2 जखमी.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
बल्लारपूर:- गेले कित्येक दिवस बल्लारपूरमध्ये हत्येची घटनेत वाढ झाली आहे, बेकायदेशीर कारवायांमुळे खुनाच्या घटनेत वाढ होत आहेत. #Murder #Ballarpur
मिळालेल्या माहितीनुसार दि. 30 ऑगस्टच्या रात्री 9.30 वाजता स्केअर पॉइंट बेअर बारजवळ 30 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली.
मृतक 34 वर्षीय मिलिंद बोन्दाडे किल्ला वार्ड निवासी आहे. मृतांना वाचवण्यासाठी आलेल्या तरुणांवर हल्ला करण्यात आला, त्यात संघपाल कामडे आणि इतरांचा एकाचा समावेश आहे.
जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. बल्लारपूर मध्ये हत्या अवैध व्यवसायामुळे ही हत्या झाली आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या चोरीच्या घटनेत मृत युवक आणि मारेकऱ्याचा सहभाग असल्याची बाब समोर आली आहे. सध्या बल्लारपूर पोलीस हत्येच्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत