‘भारतासाठी आता लक्ष्य PoK’:- सोपान कनेरकर #sopankanerkar #motivation #Washim


'अश्रूंच्या महासागरात राष्ट्रभक्तीने न्हाऊन निघाले वाशीमकर'

हास्य आणि अश्रूंत रंगला 'अखंड भारत दिन'
व्यक्तीच्या मनातील आत्मभावाच्या विकासाची ही पहिली पायरी नाही अन शेवटचीही पायरी नाही. पहिली पायरी आहे कुटुंब. त्यानंतर क्रमाने भवताल, गाव, ग्रामसमूह, असे करत करत 'आत्मवत सर्वभूतेषु’ इथवर प्रवास चालतो. राष्ट्र ही त्या प्रवासातील वैश्विकतेच्या अलीकडची पायरी आहे. भाषा, परंपरा, इतिहास, रीतीभाती इत्यादी गोष्टी राष्ट्र जन्माला घालत नाहीत, तर आत्मभावाच्या विकासाच्या मार्गावर चालणाऱ्या स्वाभाविक क्रियाप्रतिक्रियेतून त्यांचा विकास होतो. या आत्मभावाच्या विकासाला जे जे साहाय्यक ते ते त्यामुळे स्वीकार्य ठरते, राष्ट्रीय ठरते. त्यातूनच राष्ट्रीय स्वभाव, राष्ट्रीय मूल्य आकाराला येतात. ही दृष्टी अन त्यासाठीचे प्रयत्न यातूनच भारतीय राष्ट्र विकास पावले. त्याचा स्वभाव आणि चारित्र्य घडले. म्हणूनच ख्रिश्चन, मुस्लीम, ज्यू, पारशी या सगळ्यांना भारताने उदार आश्रय दिला. भारतभरातील भाषाभूषा ऐक्यभावनेच्या आड आल्या नाहीत. भारतीय ऋषीमुनींच्या आध्यात्मिक दर्शनातून, सगळे विश्वब्रम्हांड एकाच स्पंदनाचे आविष्कार आहेत या साक्षात्कारातून ही भारतीय दृष्टी विकसित झाली. ‘व्यक्तीच्या मनातील आत्मभावाच्या विकासातून राष्ट्र उदयाला येते’ #sopankanerkar 
अखंड भारत हे स्वप्न एकदम नव्हे तर टप्प्या टप्प्याने पूर्ण होईल. पहिली गोष्ट म्हणजे जम्मू-काश्मीर हे आतापर्यंत मुख्य प्रवाहात नव्हते. ते राज्य आता कलम ३७० रद्द झाल्याने देशाशी जुळले गेले आहे. आता पुढले लक्ष्य हे भारतीय जमीन परत मिळवण्याचं आहे. ही जमीन जी अवैधरित्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे. आणि पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचा प्रस्ताव संसदेत १९९४मध्ये मंजूर करण्यात आला होता, असे सोपान कनेरकर यांनी सांगितले. #motivation #Washim
२०व्या शतकातील भारत हा नुकताच स्वतंत्र झाला होता. स्वातंत्र्यानंतरची स्वप्न पूर्ण करण्याची त्यावेळी जबाबदारी होती. मात्र हे २१ शतक आहे. आजची पिढी महत्त्वाकांशी आणि व्यवहारीक आहे. कारण ही पिढी तरुणांची आहे, काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणं हे अखंड भारताच्या उद्देशाचं पहिलं पाऊल होतं. आता पुढचं पाऊल हे पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचं आहे.असे प्रतिपादन ख्यातनाम युवा वक्ते सोपान कनेरकर यांनी वत्सगुल्म युवा प्रतिष्ठान आयोजित अखंड भारत दिना निमित्त जाहिर व्याख्यान प्रसंगी केले. #Adharnewsnetwork
यावेळी प्रमुख अतिथी रा.स्व.संघ जिल्हा संघचालक दादासाहेब ढोबळे, माजी आमदार विजयराव जाधव, माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू, संयोजक तथा भाजयुमो प्रदेश कार्य.सदस्य प्रदीपजी देशमुख, शिक्षक युवा नेते प्रणवजी बोलवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष धंनजय हेंद्रे,नगरसेवक भीमकुमार जीवनानी, अमित मानकर, वैभवजी वायचाळ उपस्थित होते.
यावेळी कनेरकर पुढे म्हणाले कि, भारताची फाळणी झाली, त्याच्या सहा महिन्यांपूर्वी असे कधी घडेल, याचा विचार कोणी स्वप्नातही केला नव्हता. फाळणी हे मुर्खांचे स्वप्न आहे, अशी प्रतिक्रिया जवाहरलाल नेहरून यांनी त्यावेळी दिली होती. मात्र, तरीही फाळणी झाली. तेव्हा फाळणी झाली असली, तरी आताच्या घडीला अखंड भारत शक्य आहे, जगत्कल्याणासाठी गौरवशाली अखंड भारताची आवश्यकता आहे. यासाठी देशभक्ती मोठ्या प्रमाणात जागृत करणे गरजेचे आहे. फाळणी झालेला भारत पुन्हा एकदा अखंड करणे काळाची गरज आहे. जे भारताला आता स्वतःचा भाग मानत नाही, त्यांना तर अधिक गरज आहे.
गंधार अफगाणिस्तान झाले. त्या क्षेत्रात शांतता नांदत आहे का, असा प्रश्न विचारत भारताची फाळणी करून पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. तेथेही शांतता नांदत नाही. भारत अनेक आव्हानांना सामोरा जाण्यास सक्षम आहे. वसुधैव कुटुंबकमच्या माध्यमातून जगात आनंद आणि शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते.
अखंड भारताची धारणा हा आमच्या संपूर्ण जीवनदर्शनाचा मूलाधार आहे. जर आम्ही युगायुगातून वाहत आलेल्या आपल्या जीवनधारेच्या अंत:प्रवाहाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करू, तर आम्हाला असे आढळून येईल की, आमची राष्ट्रीय चेतना सदैव अखंडतेसाठी प्रयत्नशील राहिलेली आहे आणि त्या प्रयत्नात आम्ही पुष्कळ प्रमाणात सफलही झालो आहोत. १९४७ चा पराजय हा भारतीय एकत्वाच्या अनुभूतीचा पराजय नाही, तर राष्ट्रीय एकतेच्या नावावर केलेल्या भ्रांत प्रयत्नांचा पराजय आहे. जर भौगोलिक दृष्ट्या खंडित झालेल्या भारतात हिंदू मुस्लिमांमध्ये एकत्वाची अनुभूती शक्य असेल, तर शेष भूभाग आपल्याशी एकजीव व्हायला वेळ लागणार नाही. एकतेच्या अनुभूतीच्या अभावाने जर देश खंडित झाला आहे, तर त्या अनुभूतीच्या अस्तित्वाने तो अखंड होईल. आम्ही त्याचसाठी प्रयत्न करायला हवा.’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत