Click Here...👇👇👇

रानभाज्यांची विक्री मोबाईल व्हॅन वरून करा. #Chandrapur

Bhairav Diwase
खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते कृषिमाल निर्माण केंद्र कक्षाचे उद्घाटन.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर :- रानभाज्यांची मोठ्या प्रमाणे ग्रामीण भागात उपलब्धता आहे. परंतु प्रत्यक्ष शहरी भागातील ग्राहकांपर्यंत या भाज्या उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे शहरी भागात मोबाईल व्हॅन द्वारे रानभाज्यांची विक्री करून शहरी भागातील लोकांना रानभाज्यांची गोडी निर्माण करावी अशी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी कृषी अधिकाऱ्यांना केल्या. ते आज झालेल्या रानभाज्या महोत्सवा च्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी उपसंचालक रवींद्र मनोहरे, कृषी अधिकारी गणेश मादेवार, देशमुख साहेब यांची उपस्थिती होती.#Adharnewsnetwork


यावेळी खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते कृषिमाल निर्माण मार्गदर्शन केंद्र या कक्षाचे उद्घाटन झाले. यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी प्रत्यक्ष रानभाज्या विक्री केंद्राला भेटी दिल्या त्यावेळी त्यांनी संबंधित विक्रेत्यांचे म्हणणे ऐकले त्यामध्ये त्यांच्या समस्या जाणून घेताना मागणी तसेच पुरवठा आहे परंतु आम्हाला हक्काची बाजारपेठ नसल्याने हा माल विकायचा कुठे असा प्रश्न त्यांनी यावेळेस उपस्थित केला त्यावेळी खासदार धानोरकर यांनी नाविन्यपूर्ण योजनेतून मोबाईल व्हॅनद्वारे येत्या काळात हामाल विकण्याकरिता हक्काचे बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.#Chandrapur