Top News

पोंभूर्णा पोलीस स्टेशनमध्ये पार पडली शांतता समितीची बैठक. #Policestation #Pombhurna


पोंभूर्णा:- पोंभूर्णा पोलिस स्टेशनमध्ये नुकतीच शांतता समितीची बैठक पार पडली. कोरोनाचे नियम पाळत गणेशोत्सव साजरा करण्यात यावा तसेच मंडळाने आरोग्य विषयक कार्यक्रम राबविण्यावर भर देण्यात यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. कोरोनाचे संकटाच्या छायेत गणेशोत्सव साजरा करताना आपण सारे कायदा व सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे. मिरवणुकीपेक्षा माणसाचा जीव वाचवणे हे सर्वाधिक महत्त्वाचे असल्याने यावेळी कोरोनाचे संक्रमण रोखणे हि आपली सर्वांची जबाबदारी आहे. सर्वांनी मिळून गणेशोत्सव साजरा करू असे मार्गदर्शन ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांनी केले. #Policestation #Pombhurna

सभेच्या सुरुवातीला गणेशोत्सवा संदर्भात शासनाच्या सूचनांचे वाचन करून उपस्थितांना अवगत करण्यात आले. श्री गणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळांसाठी ४ फुट व घरगुतीसाठी २ फुट एवढी मर्यादीत ठेवण्यात आली आहे. गणेश मंडळांच्या सार्वजनिक न्यास नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. गणेश मंडळांनी आरोग्य विषयक कार्यक्रम राबविण्यावर भर देण्यात यावे तसेच मंडप सजावट साधेपणाचे असावे भपकेगीरी नसावी अशी सुचनाही यावेळी देण्यात आली. #Adharnewsnetwork
प्रत्येक गणेश मंडळाने पल्स ऑक्सिमिटर घेऊन आपापल्या भागात लोकांची ऑक्सिजन पातळी मोजण्याचे काम करावे. गणेश मंडळात निर्जतूकीकरणाची व थर्मल स्क्रिनींगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.प्रत्यक्ष दर्शन घेऊ ईच्छीणार्या भाविकांसाठी शारीरिक अंतर ठेवणे , मास्क व सॅनिटाईझर पाळण्याकडे विषेश लक्ष देण्याच्या संदर्भात सांगण्यात आले गणेश स्थापना ते विसर्जन या कालावधीत होणारे गर्दीचे प्रसंग टाळून आपण आपले व आपल्या परिवाराचे रक्षण करावे. असे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी अध्यक्षस्थानी ठाणेदार धर्मेंद्र जोशी, सदस्य सचिव पोलिस उपनिरीक्षक दादाजी ओल्लालवार, शांतता समितीचे सदस्य पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, उपसभापती ज्योती बुरांडे, पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख,सामाजिक कार्यकर्ते ओमेश्वर पद्मगिरिवार, सरपंच संवाद संघटनेचे तालुका अध्यक्ष रोशन ठेंगणे, पी.एच.गोरंतवार, महेश रणदिवे, बबनराव गोरंतवार, सद्गुरू ढोले, राकेश नैताम, पोलिस अंमलदार बादल जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने