Top News

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चोरी. #Theft


१० हजाराची रक्कम लंपास आरोपी फरार.
(संग्रहित छायाचित्र)
कोरपना:- कोरपना तालुक्यातील लखमापूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार पहाटेच्या वेळी उघडकीस आला. मध्यरात्रीच्या सुमारास मंदिरात घुसलेल्या चोरट्यानी ८ ते १० हजाराची रक्कम लंपास केल्यानें एकच खळबळ उडाली. #Theft
याबाबत समिती अध्यक्ष दादाजी आस्वले उपाध्यक्ष रामदास आवंडे यांनी पोलीस स्टेशन गडचांदूर येथे तक्रार दाखल करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
लखमापूर येथील दानशूर महिला गिरजाबाई मडावी यांनी स्वतःची जागा विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी दान देण्यात आली व त्या जागेवर लखमापूर येथील नागरिकांनी लोकवर्गणीतून विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधून मूर्तीची स्थापना केली होती.
२७ ऑगस्ट रोज शुक्रवारला पहाटेच्या सुमारास शंकर खिरवटकर व भारत ढाकणे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आरती करिता गेले असता मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून बाजूला फेकून असल्याचे आढळले व आत बघितले असता मंदिराच्या दान पेटीचे कुलूप सुद्धा तोडून टाकल्याने बघितले असता १० हजाराची रक्कम लंपास केल्याचे आढळून आल्याने तक्रारीची दखल घेत पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे, शकील अन्सारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने