💻

💻

गावखेड्यांच्या विकासाला प्राध्यान्य जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचे प्रतिपादन. #Pombhurna


पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील जामखुर्द येथे विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावखेड्यांचा शाश्‍वत सर्वागिण विकास साधण्यास प्राध्यान्य दिले जात असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी व्यक्त केले. #Pombhurna
             
 
       पोंभूर्णा तालुक्यातील जामखुर्द येथे विविध विकासमांचे भूमीपुजन शनिवार पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला जामखुर्दचे सरपंच धनराज बुरांडे, पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, उपसभापती ज्योती बुरांडे, पिंटू मंगळगिरीवार, ऋषी कोटरंगे, हरी मडावी, सोमनाथ टिकले, शाहू मडावी, मधुकर टिकले, ताराचंद गेडाम, जीवन येरमे, विलास बुरांडे, रविंद्र टिकले, रंजित गेडाम, राहुल चलाख आदींची उपस्थिती होती. #Adharnewsnetwork
       
       जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी म्हणाल्या, माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्राचा झपाट्याने कायापालट झाला आहे. याआधीचे पोंभूर्णा, मूल  व बल्लारपूर शहरात कधी नव्हे इतक्या विकासाची गंगा वाहिली. बाहेरचा व्यक्ती ही शहरे बघून अवाक् होतोय. शहरात काय बदल झालाय, हे वाक्य ऐकताच मनाला समाधान लाभते. याच धर्तीवर या विधानसभा क्षेत्रातील गावखेड्यांचाही कायापालट करण्याचा निर्धार केला असून, त्या दिशेने विकासात्मक कामे केली जात असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. या क्षेत्रातील गावखेड्यांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत