💻

💻

वैद्यकीय अधिक्षकाकडून "पॅथॉलॉजी लॅब" तपासणी अहवाल सादर. #PathologyLab(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरपना:- तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूर येथील पोस्ट ऑफिस जवळील "श्री मॉयक्रो बॉयलॉजी & पॅथॉलॉजी लॅब" (डॉ. ओमप्रकाश बोबडे) या लॅबमध्ये अनागोंदी व बेजबाबदारपणे कारभार सुरू असून याठिकाणी अनुभवी डॉक्टर, टेक्निशियन उपस्थित राहत नसून बिना अनुभवी मुलामुलींच्या भरवशावर सदर लॅब सुरू आहे.रक्ताच्या नमुन्यांची रिपोर्ट आनलाईन चंद्रपूर वरून येते. 
वास्तविक पाहता अशा ठिकाणी अनुभवी डॉक्टर, टेक्निशियनची उपस्थिती आवश्यक आहे. मात्र निव्वळ पैसा कमवण्यासाठी रुग्णांच्या जीवाशी खेळले जात असल्याचे आरोप होत आहे.सदर लॅब मधून चुकीच्या रिपोर्ट दिल्याच्या घटना घडत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे प्रकरणात वाढ होताना दिसत आहे."रुग्ण गडचांदूरात आणि डॉक्टर चंद्रपूरात" अशी परिस्थिती असून या लॅबची निष्पक्ष चौकशी करून याला बंद करावे अशी मागणी कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाने संबंधितांकडे निवेदनाद्वारे केली होती.#Adharnewsnetwork
याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा शल्य चिकित्सकांच्या आदेशावरून गडचांदूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत गेडाम यांनी शहरातील समस्त लॅबची तपासणी करून १४ आगस्ट रोजी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दरबारी अहवाल पाठवला आहे.त्यात सविस्तर अशी सत्य परिस्थिती नमूद करण्यात आली असून आज सात दिवसाचा कालावधी लोटूनही याविषयी काहीच कारवाई झालेली दिसत नाही.नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या या गंभीर विषयी जिल्हा शल्य चिकित्सक केव्हा आणि काय निर्णय घेतात याकडे तक्रारकर्ते कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या समस्त पत्रकार बांधवांचे लक्ष लागले आहे.#PathologyLab

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत