Top News

अखेर...... जुनगाव ग्रामपंचायतीच्या चपराशी पदाची निवड रद्द!


नियमानुसार नियुक्ती करण्याचे संवर्ग विकास अधिकारी यांचे आदेश.

पोंभुर्णा:- तालुक्यातील जुनगाव येथील ग्रामपंचायत शिपाई पदाची केलेली भरती संवर्ग विकास अधिकारी पोंभूर्णा यांनी एका आदेशाद्वारे रद्द ठरविलेली असून ग्रामपंचायतीने नियमाला बगल देत केलेल्या पदभरती बाबत स्वतः अडचणीत आली आहे.

ग्रामपंचायत जुनगाव येथील दिनांक 30/03/ 2021रोजी मासिक सभा ठराव क्रमांक 5 प्रमाणे ग्रामपंचायत कर्मचारी पदभरती कार्यक्रम जाहीर करून पात्र उमेदवारांकडून अटी व शर्तीच्या अधीन राहून अर्ज मागविण्यात आले होते‌ . त्यानुसार गावातील आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले व दिनांक 30/06/0 21चे मासिक सभा ठराव क्रमांक 5 प्रमाणे अर्जाची छाननी व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली‌. तपासणीअंती आठही उमेदवारांचे अर्ज कायम करण्यात आले. दिनांक 15/ 7/ 2021 च्या मासिक सभेत संदर्भीय पत्र क्रमांक 1 शासन निर्णय परिपत्रकात नमूद केलेल्या नुसार 100 गुणांची लेखी चाचणी परीक्षा न घेता सूचक व अनुमोदक या पद्धतीने श्री भारत खुशाल पाल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सदर ग्रम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची निवड ही नियमबाह्य झाली असल्याने दिनांक 15 ऑक्टोबर 2015 चे परी‌. २ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे ग्रामपंचायत जुनगाव ने केलेली पदभरती संवर्ग विकास अधिकारी यांनी रद्द ठरवलेली आहे.

तद्वतच ग्रामपंचायतीला तंबी देताना ,कर्मचारी पदाची पदभरती ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 61 नुसार करावी व पदभरतीची पूर्ण प्रक्रिया पारदर्शक व शासन निर्णय क्रमांक/ प्रानिमं/१२१५/प्र.क्र.१०९/१५/१३-अ दिनांक 5 ऑक्टोबर 2015 चे परि.२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचारी पदभरती करावी असे स्पष्ट आदेश ग्रामपंचायतीला प्राप्त झाले असून ग्रामपंचायत या निर्णया विरोधात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे‌‌.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने