सुजल पाणी वापर संस्था नवेगाव मोरे च्या अध्यक्षपदी विनोद (बालू) दिवसे यांची निवड. #Pombhurna

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- सुजल पाणी वापर संस्था व्यवस्थापन समिती नवेगाव मोरे च्या सदस्यांची नुकतीच निवडणूक घेण्यात आली‌. या निवडणुकीत समितीच्या सर्व सदस्यांची निवड करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी विनोद शामराव दिवसे यांची निवड झाली आहे. #Pombhurna

ही निवड सन 2021 ते 2027 या दोन वर्षाच्या कालावधी करिता आहे‌. या संस्थेच्या इतर सदस्यांमध्ये कुसुम प्रभाकर पावडे, विनोद शामराव दिवसे, दिलीप भगवान गौरकर, कमलाकर झाडे, सरस्वती मुकुंदा ढवळस, बंडू टारू अर्जुनकर, अरुण काशिनाथ लडके, परशुराम सखाराम झाडे, सुलका बाई वेलादी, आनंदराव झुंगा आलाम, बोंडकु दोनो जी मडावी, रवींद्र गजानन आलाम इत्यादी सदस्यांचा निवडून आलेल्या मध्ये समावेश आहे. #Adharnewsnetwork
निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे , अध्यक्षांचे पंचायत समिती सदस्य गंगाधर मडावी यांनी अभिनंदन केले आहे.