ब्रम्हपुरी:- गोसेखुर्द कालव्यात पडून वाहत येत असताना एक महिला पालेबारसा येथील गोसेखुर्द नहरांत पालेबारसा वासियांना मृतदेह आढळून आला. त्यानंतर नागरिकांनी पोलीस स्टेशन पाथरी येथे माहिती दिली असता पोलीस कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले. #Death #Chandrapur
मृतक महिला ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी पोलिस चौकी अंतरगत येत असलेल्या गणेशपूर येथील 45 वर्षीय निर्मला बालाजी नेवारे असे नाव आहे. मृतदेह नहराच्या बाहेर काढून शवविच्छेदणाकरिता सावली येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे. पुढील तपास पाथरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. #Adharnewsnetwork