💻

💻

विज वितरक मंडळाच्या निष्काळजी पणामुळे 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू. #Death


जिवती तालुक्यातील पिट्टीगुडा नं. 2 येथील घटना.

जिवती:- अतीदुर्गम भाग म्हणुन ओळखला जाणाऱ्या जिवती तालुक्यातील पिट्टीगुडा नं. 2 या गावातील एका 27 वर्षीय युवकाच विजेच्या खांबाला स्पर्श होऊन मृत्यु झाल्याची घटना दि. 20/08/2021 ला दुपारी 3 च्या सुमारास घडली असुन विद्युत विभाग जिवती येथील कर्मचारी याच्या सोबत भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधून चोविस तास लोटुन सुद्धा कोणत्याही कर्मचारी यांची भेट दिली नाही. #Death
इलेक्ट्रीक डिपार्टमेंट यांच्या गैर जिमेदारी पणामुळे ही घटना घडली असुन या अगोदर पुर्व सुचना म्हणुन दि. 12/07/2021 ला ग्रामपंचायत कार्यालय पिट्टिगुडा नं 2 यांच्या वतीने विद्युत विभाग जिवती यांना रामेश्वर उत्तम राठोड यांच्या घराजवळील इलेक्ट्रीक पोल दुरुस्ती बाबत तरी सुद्धा इलेक्ट्रीक डिपार्टमेंट चे कोणतेही अधिकारी आलेले नाही. #Adharnewsnetwork
       सततच्या यांच्या गैर जिम्मेदारी मुळे आज मृत्यू पावलेला युवक नामे परमेश्वर पंडु चव्हान यांच्या मृत्यू मागचे कारन इलेक्ट्रीक डिपार्टमेंट जिवती हे आहेत असा आरोप पोलीस पंचनामा च्या वेळी मृतकाचे कुंटूबीयानी केला आहे. तरी पिडीत कुटूबीयांची भेटीसाठी धावुन गेलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समिती चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष सुदाम राठोड व जिवती तालुका अध्यक्ष सुनिल राठोड यांनी वारंवार सुचना देऊन सुद्धा निष्काळजी दाखविणाऱ्या अधिकाऱ्याला तत्काल निलंबित करुन पिडीत कुंटूबीयाना 10 लाखाची मदत करावी अशी मागनी उर्जामंत्री नितीन राउत यांच्याकडे केली आहे. आणि त्या गैर जिम्मेदार अधिकाऱ्यांना तात्काल निलंबित करा अन्यथा विदर्भ राज्य आंदोलन समिती तिव्र आंदोलन करेल असा इशारा सुदाम राठोड यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत