जीवनोन्नती महिला प्रभागसंघ नवेगाव मोरे कार्यालयास डॉ. मित्ताली सेठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांची भेट. #Pombhurna


(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभुर्णा:- उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण व शाश्वत उपजीविका निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे. महिलांसाठी त्रिस्तरीय संरचना करून सर्वांगीण विकासासाठी स्वयं सहाय्यता समूह, ग्रामसंघ, प्रभाग संघ अश्या संस्था निर्माण करण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण जिल्हात 11हजार स्वयं सहाय्यता समूह, 980 ग्रामसंघ व 56 प्रभाग संघ तयार करण्यात आलेले आहेत. #Pombhurna

💉जीव धोक्यात टाकून तालूका आरोग्य अधिकाऱ्याने केले गंगापूर गावचे शंभर टक्के लसीकरण.
नव्याने रुजू झालेल्या डॉ. मित्ताली सेठी मॅडम CEO जिल्हा परिषद चंद्रपूर तथा जिल्हा अभियान संचालक उमेद चंद्रपूर यांनी महिला सक्षमीकरण व त्या माध्यमातून निर्माण होत असलेली शाश्वत उपजीविका जाणून घेण्यासाठी,प्रत्यक्षात महिलांशी त्यांची प्रगती समजून घेण्यासाठी जीवनोन्नती महिला प्रभाग संघाला दि. ३० ऑगस्ट ला भेट दिली. #Adharnewsnetwork
        या भेटी दरम्यान निर्माण झालेल्या संस्थेचे कामकाज कश्या स्वरूपात चालते हे प्रभाग संघातील पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून जाणून घेतले. या पूर्वी महिला चूल आणि मूल इतपर्यंतच सीमित होत्या परंतु प्रभाग संघाच्या माध्यमातून लाखो रुपयांची आर्थिक देवाणघेवाण करीत असल्याचे बघून समाधान व्यक्त केले. तसेच महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची विक्री ऑनलाईन पद्धतीने करावेत जेणे करून त्या वस्तूंची मागणी वाढेल व महिलांना रोजगार मिळेल. सेंद्रिय पद्धतीने पिकवित असलेले धान्य,कडधान्ये यांना बाजारपेठेत मागणी आहे व ती ग्राहकांन पर्यंत पोहचवावीत या बाबतच्या सूचना देण्यात आल्या. 
             
        उमेद अभियाना मार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची प्रदर्शनी डेमो स्वरूपात स्टॉल लावण्यात आलेले होते. त्या स्टॉल वरील प्रत्येक वस्तूंची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी करून महिलांच्या कमांची प्रसंशा केली. सेंद्रिय शेती करीत असलेल्या शेतकरी महिलांना स्कोप सर्टिफिकेट वाटप मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
             
        या वेळेस श्रीमती सुनीता मरसकोल्हे गट विकास अधिकारी, श्री. गंगाधर मडावी पं.स. सदस्य पोंभुर्णा तसेच सौ. ललिताताई पोरटे -अध्यक्ष, सौ. शिलाताई वागदरकर -सचिव, सौ. भाग्यश्री ताई देठे- कोषाधक्ष व इतर सर्व सदस्य जीवनोन्नती महिला प्रभाग संघ उपस्थित होते. त्याच प्रमाणे जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्व कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी घडवून आणण्यासाठी सर्व कॅडर यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत