भाजपा कार्यकर्ते अजय बांदूरकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून गोवरी येथे 172 पूरग्रस्त कुटुंबांना ब्लॅंकेट वाटप. #Birthday #rajura

Bhairav Diwase
🟥
कृषी, पशुसंवर्धन सभापती जि. प चंद्रपूर यांच्या हस्ते वाटप.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- दिनांक 29 ऑगस्ट ला भाजपा कार्यकर्ते अजय बंदूरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कृषी व पशुसंवर्धन सभापती जिप चंद्रपूर यांच्या पुढाकाराने गोवरी येथे 172 पूरग्रस्त कुटुंबांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. #Birthday #rajura
🟥
💉जीव धोक्यात टाकून तालूका आरोग्य अधिकाऱ्याने केले गंगापूर गावचे शंभर टक्के लसीकरण.

22 जुलै ला झालेल्या अतिवृष्टीमुळे गोवरी गावातील 172 घरामध्ये पाणी शिरून अन्नधान्य व इतर सामग्रीचे अतोनात नुकसान झाले ते सर्व कुटुंब शासनाकडे मदतीचा आशेने पाहत असून अजूनही कोणतीच शासनाकडून मदत मिळालेली नसल्याने अशा परिस्थितीत कृषी सभापती यांच्या पुढाकारातून एका सामान्य कार्यकर्ता अजय बांदूरकर यांच्या वाढदिवसाचे निमित्य साधून सर्वच 172 कुटुंबांना काहीतरी मदत म्हणून ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
🟥
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शंकर बोढे, ग्रास सिद्धार्थ कास्वटे, अनिल मालेकर, प्रभाकर काळे, संबाशीव जुनघरे, नामदेव उरकुडे, अविनाश उरकुडे, तंटा मुक्ती अध्यक्ष गोपीनाथ जमदाडे, विलास लोहे, ज्ञानेश्वर मशारकर, भास्कर वनकर, विनोद वांढरे, मार्कंडी लांडे, दिनेश घागरगुंडे, नथु चिंचोळकर, विठ्ठल चिंचोळकर तथा शेकडो युवा कार्यकर्ता उपस्थित होते. 🟥