जाहिरात... Advertisement... विज्ञापन

नगर पंचायत पोंभुर्णा अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्रशासकीय काम बंद ठेवून केला जाहीर निषेध. #Prohibition

ठाणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे हल्ला प्रकरण.
(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभुर्णा:- समाजामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. यावर प्रतिबंधक असे अनेक कायदे असले तरी त्या कायद्यांचा वापर मात्र दैनंदिन जीवनात फारसा होताना दिसत नाही. अशीच एक घटना काल दिनांक ३० ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास ठाणे येथे घडली. #Prohibition

💉जीव धोक्यात टाकून तालूका आरोग्य अधिकाऱ्याने केले गंगापूर गावचे शंभर टक्के लसीकरण.

ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे, माजीवाडा प्रभाग यांनी अतिक्रमण विरोधी पथकासह अनाधिकृत हातगाड्यांवर कार्यवाही केली असता तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचे हातगाडी फेरीवाले श्री अमरजित यादव यांनी त्यांचावर व त्यांचे अंगरक्षक श्री सोमनाथ पालवे यांचावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला करून या दोघांनाही गंभीर दुखापत केली. #Adharnewsnetwork
कर्तव्य बजावणार्‍या अधिकाऱ्यांवर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा हल्ले करतात, तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खचले जाते.  या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून नगर पंचायत पोंभुर्णा येथील अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग यांच्या कडून आज दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ रोजी प्रशासकीय कामकाज बंद ठेवून जाहीर निषेध करण्यात येत आहे असे प्रतिपादन नगर पंचायत पोंभुर्णा तर्फे केले आहे. तसेच तालुक्यातील नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आव्हाहनही करण्यात आले.
याच घटनेच्या पार्श्वभुमीवर गुन्हेगारांविरुद्ध योग्य ती कडक कार्‍यवाही व्हावी या बाबतचे निवेदन नगर पंचायत पोंभुर्णा अधिकारी व कर्मचारी यांचेकडून तहसिलदार पोंभुर्णा मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना देण्यात आले. अशाच घटना जर भविष्यात घडत राहिल्या तर आम्ही आपले कर्तव्य कसे बजवायचे हा प्रश्न सरकारी कर्मचार्‍यांपुढे उभा झाला आहे. या घटनेची लवकरात लवकर योग्य ती दखल घेऊन न्याय मिळावा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत