कृषी, पशुसंवर्धन सभापती सुनिल ऊरकुडे यांच्यातर्फे कॅन्सरग्रस्ताला आर्थिक मदत. #Help

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा 
राजुरा:- दि.30 ऑगस्ट रोजी मौजा भेंडवी ता. राजुरा येथील कॅन्सरग्रस्त विनेश शामराव चिंतापुरी यांची माहीती भाजपा नेते वामनजी तुरानकर यांचेकडुन मिळताच त्यांचे घरी जाऊन या युवकाला कृषी सभापती सुनिल ऊरकुडे यांनी भेट घेऊन विचारपूस केली त्या युवकाची घरची परिस्थिती खुप हलाकीची असुन घरात कमविणारे कोणीही नाही अश्या परिस्थितीत त्यांना आरोग्य योजनेतुन उपचार करण्यासाठी योग्य माहिती दिली. #Help

💉जीव धोक्यात टाकून तालूका आरोग्य अधिकाऱ्याने केले गंगापूर गावचे शंभर टक्के लसीकरण.

एखादे संकट आल्यानंतर माणुस पुर्णपने खचुन जातो. त्यावेळी माणसाला कुणाचा तरी आधार हवा असतो तेच यावेळी सुनिलभाऊने त्यांच्या कुटुबियांना व त्या व्यक्तीला आधार दिला व आर्थिक मदत देऊ केली. या मदतीचा त्यांना उपचारासाठी नक्कीच फायदा होणार.
 
     याप्रसंगी श्री.वामणजी तुरानकर ऊपसरपंच नोकारी, शंकर नन्नावरे,श्री.विनोद बेगलिवार,श्री.संतोष सलाम,श्री.अंकुल सलाम,श्री.सुनिल आञाम,श्री.शामराव चिंतापुरी,श्री.संतोष मारोती रेषेन,प्रविण कामीला ऊपस्थित होते या सर्वांनी व कुटुंबियानी सुनिलभाऊंचे आभार मानले.