Top News

चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा, येथे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा. #Pombhurna #cccp


पोंभुर्णा:- स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा, येथे शारीरिक शिक्षण आणि खेळ विभागाद्वारे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. #Pombhurna #cccp
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. त्र्यंबक गुल्हाने होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन आणि स्पोर्ट चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स विभाग प्रमुख प्रा. संतोष कुमार शर्मा यांच्यासह प्रा. वासेकर सर, प्रा. कल्याणकर सर, अतुल अल्याडवार इत्यादी उपस्थित होते.
यावेळी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला तसेच प्रा. नितीन उपरवट, डॉ. पूर्णिमा मेश्राम, प्रा.ओमप्रकाश सोनोने यांनी भारतीय खेळ आणि सद्यस्थिती आणि मेजर ध्यानचंद यांचे स्थान यावर भाष्य केले.
   
   प्राचार्य डॉ. त्र्यंबक गुल्हाने यांनी मेजर ध्यानचंद यांच्या खेळ कौशल्यावर प्रकाश टाकला. मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रात कसे प्रेरणास्थानी आहेत याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. संघपाल नारनवरे यांनी केले. सदर कार्यक्रमास  महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने