Top News

मैदानी खेळ आणि शारीरिक व्यायाम मानवी आरोग्यासाठी गरजेचे : डॉ. सुधीर हुंगे. #Pombhurna


पोंभुर्णा:- आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये शरीराकडे दुर्लक्ष होत असताना मानवी शरीराला मैदानी खेळाची त्याचप्रमाणे शरीराला व्यायामाची गरज आहे हे डॉक्टर सुधीर हुंगे यांनी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती दिनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून हे विचार प्रकट केले. चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे भारतीय हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. #Pombhurna
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. टी. एफ. गुल्हाने सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर हुंगे सर, प्राध्यापक संतोष कुमार शर्मा शारीरिक निदेशक हे उपस्थित होते. आपल्या भाषणामध्ये डॉक्टर टी.एफ. गुल्हाणे सर यांनी उपस्थितांना संबोधताना खेळामध्ये सुध्दा आपले करिअय घडविता येते हे समजावून सांगितले.
   त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुधीर हुंगे सर उपस्थिताना सुदृढ आरोग्साठी मैदानी खेळाचे महत्त्व समजावून सांगितले. मान्यवरांनी आपआपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक संतोष कुमार शर्मा यांनी केले तर  संचालन प्राध्यापक अमोल गर्गेलवार सर यांनी केले तर पाहुण्यांचे आभार डॉ. मेघा कुलकर्णी यांनी मानले.
      कार्यक्रम हा कोविड नियमांचे पालन करुन शासनाच्या तसेच विद्यापीठाच्या नियमानुसार विशिष्ट अंतर राखुन व चेहऱ्यावर मुखपट्टीचा वापर करुन साजारा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने