चंद्रपुर जिल्ह्यातील पाचगाव वनसमितीचे सदस्याला वाघाचे अवयव विक्री करताना अटक. #Arrested


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील गोडपिपरी तालुक्यातील कोठारी वनक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या पाचगाव नियत क्षेत्रात वाघाची शिकार करून अवयव विक्री करीत असताना नागपूर मार्गावरील बुटीबोरी येथे मुद्देमालासह आरोपीला अटक करण्यात आली. #Arrested
प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील पाचगाव हे वनक्षेत्र वनहक्क दाव्या अंतर्गत वनसंवर्धन करण्यासाठी अनुसुचित जमाती प्रवर्गाला इतर पारंपरिक वननिवासी म्हणून वनसमितीला हस्तांतरण करण्यात आले. मात्र येथीलच वनसमितीचे लाभार्थी वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांच्या अवयवाची विक्री करीत असल्याची बाब उघड झाली आहे.
       
    पाचगाव येथील महादेव आळकू टेकाम हा वाघाचे अवयव विक्री साठी जात असताना बुटीबोरी वनक्षेत्राचे वनक्षेत्राधिकारी एल. व्ही. ठोकड यांच्या पथकाने ताब्यात घेतले. ही घटना रविवार च्या रात्री निदर्शनास आल्याने मुद्दे मालासह आरोपी ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. चौकशीत चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील पाचगाव व कोठारी वनक्षेत्रातील नियत क्षेत्र असल्याने तपास चक्रे या दिशेने गतीमान झाली. तपास अधिकारी एल. व्ही. ठोकड यांच्या समवेत कोठारी चे वनक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे , राजुरा फिरते पथकाचे अधिकारी विनायक नरखेडकर, व बल्लारपूर फिरते पथकाचे अधिकारी गादेवार आणि वनकर्मचारी चंमुंसह आरोपींच्या गावी झडती घेतली असता शिकारीचे अवजारे आढळून आले. त्याच सोबत मुख्य आरोपी महादेव आळकू टेकाम वय ५० वर्ष, विजय लक्ष्मण आलाम वय ४५ वर्षे, रामचंद्र नागो आलाम ५५ वर्षे यांना ताब्यात घेण्यात आले. आणि यांना पुढील तपासासाठी बुटीबोरी वनक्षेत्राकडे रवाना करण्यात आले आहे. त्यातील चौथा आरोपी लकव्याने पिडित असल्यामुळे त्यास मुभा दिल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे. पुढील तपास बुटीबोरी वनक्षेत्राचे वनक्षेत्राधिकारी करीत असून ज्या भागातून आरोपी ताब्यात घेण्यात आले ते क्षेत्र अनुसुचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी म्हणून वनसमितीला हस्तांतरण करण्यात आलेले राखीव वनक्षेत्रात घडली असल्याने या तस्करी मागे करता करविता कोणी असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत