सर्पदंश होवून मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास आर्थिक सहाय करा- डाॅ. अंकुश आगलावे #Snake(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- सर्पदंश होऊन मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास आर्थिक सहाय देण्यात यावे अशी मागणी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डाॅ. अंकुश आगलावे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
डाॅ. आगलावे यांनी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनानुसार, चंद्रपूर जिल्हा ताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी संपूर्ण भारतात प्रसिध्द असून घनदाट जंगलाने व्यापलेला जिल्हा आहे. चंद्रपूर जिल्हयात अनेक शेतकरी, शेतमजुर व पशुधनाचा दरवर्षी सर्पदंशाने मुत्यू होतो. परंतू प्रशासन या मृत्यूची दखल घेत नाही. त्यांच्या कुटुंबियास आर्थिक मदत सुध्दा देत नाही. सर्पदंशाने मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबाचा आधार हरविल्याने कुटुंबियास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
    वन्यजीव संरक्षण सुरक्षा कायदा सन १९७२ च्या वन्यजीवाच्या यादीत साप  हा वन्यजीव प्राणी आहे. वाघ व इतर प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियास शासनाव्दारे आर्थिक अनुदान देण्यात येते. त्याचप्रमाणे सर्प दंशाने मृत्यू मुखी पडलेल्या कुटुंबियास शासनाव्दारे आर्थिक अनुदान देण्यात यावे. 
        जिल्हयातील प्रत्येक ग्रामीण रूग्णालयात अॅण्टी व्हेनम सिरम औषधीचा मुबलक प्रमाणात पुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सर्पदंशाने मूत्यूमुखी पडण्याचे प्रमाण शहरापेक्षा जास्त आहे.
  ग्रामीण रूग्णालयात औषधी पुरवठा उपलब्ध नसल्याने सामान्य रूग्णालय, चंद्रपूर येथे धाव घ्यावी लागते.  तसेच उपचारास उशीर झाल्याने मृत्यूमुखी पडण्याची संख्याही जास्त आहे. चंद्रपूर जिल्हयात सर्पदंशामुळे किती लोकांचा मृत्यू झाला. याची आकडेवारी शासनाव्दारे जाहीर करण्याची मागणीही डाॅ. अंकुश आगलावे यांनी निवेदनातून केली आहे.
#Snake

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या