Top News

अखेर...... बारावीच्या निकालाची तारीख जाहीर..... #HSCresult



पुणे:- बोर्डाच्या बारावी परीक्षेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दि. 03 ऑगस्ट ला दुपारी 4 वाजता निकाल जाहीर होणार आहे. दहावीनंतर आता बारावीचा निकालही चांगला लागण्याची अपेक्षा केली जात आहे. #HSCresult

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये होणारी बारावीची परीक्षा रद्द केली आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल लावणार असल्याचे जाहीर केले होते. राज्य मंडळाने बारावीचा निकाल उद्याला जाहीर करणार आहे. निकाल उद्याला जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन दिली आहे.
खालील दिलेल्या 3 संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.

 

12 वी बैठक क्रमांक प्राप्त करण्यासाठी खालीलमाणे जिल्हा, तालुक्याची निवड करावी, आवेदनपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्याचे नाव प्रविष्ठ करावे व Search बटणावर क्लिक करावे. दिलेल्या माहितीच्या आधारे बैठक क्रमांक उपलब्ध करून देण्यात येईल.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने