भाजपच्या समर्थ बुथ अभियानात पक्ष संघटनेवर चर्चा. #BJP

Bhairav Diwase
अभियानात मि स्वत एक कार्यकर्ता म्हणून तुमच्यासाेबत राहणार:- आमदार कृष्णा गजभे.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- कादर शेख यानी पक्षाकरिता बूथ स्तरावरील कार्यकर्ता सक्षम असला पाहिजे असे सांगितले. जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यानी नियोजित अभियानाची सक्षमपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. आमदार कृष्णा गजभे यानी अभियानात आपण स्वत एक कार्यकर्ता म्हणून तुमच्यासाेबत राहणार असे सांगितले.
याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, आमदार कृष्णा गजबे, समर्थ बूथ अभियान विधानसभा संपर्क प्रमुख कादर शेख, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू हुसैनी, कुरखेडा तालुका अध्यक्ष नाजूक पूराम, कोरची तालुका अध्यक्ष नसरूदीन भामानी, भाजपा जिल्हा सचिव प्राचार्य देवराव गजभिये, ज्येष्ठ नेते गणपत सोनकुसरे, जि. प. सदस्य गीता कुमरे, नगरसेवक ॲड. उमेश वालदे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन चांगदेव फाये यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष नाजूक पूराम यांनी मानले. यावेळी भाजपचे पदाधिकारी व शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते.#BJP