जिल्हाध्यक्ष मोहन कलेगुरवार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा. #Socialwork

भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे कोरोना योद्धांच्या सत्कार.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा युवायुग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणारे मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व मोहनभाऊ कलेगुरवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना महामारीच्या कठीण काळात जेव्हा लोक एकमेकाच्या संपर्कात सुद्धा यायला घाबरायचे अशा कठीण काळात जीवावर उधार होऊन ज्या कोरोना योद्धांनी जनतेची सेवा केली ही सेवा म्हणजे ईश्वरीय कार्य आहे त्यामुळे आज भारतीय जनता युवा मोर्चा तथा मित्र परिवाराच्या माध्यमातून भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ डोहे यांच्या नेतृत्वात कोरोना योद्धाचे शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.#Adharnewsnetwork

   कोरोना योद्धा सत्कारमूर्तीमध्ये डॉ. झिल्लेवार सर पशुधन विकास अधिकारी, डॉ. बेलसरे सर, रुग्णवाहिका चालक खुशाल लाडके, उपजिल्हा रुग्णालय येथील नर्स स्वाती पहाणपटे, नगर राजुरा येथील सफाई कर्मचार, प्रमोद कलवल, श्रावण्या तोंगापेल्ली या कोविड योद्ध्यांचा समावेश होता.
   त्याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ डोहे, जिल्हा ओबीची महामंत्री संदीप पारखी, युवा नेते लखन जाधव, युवा नेते विलास खिरटकर, भाजयुमो वि आ तालुकाध्यक्ष राहुल थोरात, भाजयुमो वि आ शहराध्यक्ष सुधीर अरकिलवार, शहर महामंत्री अजयकुमार श्रीकोंडा, हरीश ब्राह्मणे, सुनील अरकिलवार, राहुल जगत समस्त मित्र परिवार उपस्थित होते. #Socialwork

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत