Top News

असोलामेंढा नहरात दोन युवकांचा बुडून मृत्यू. #Death


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- तालुक्यातील पाथरी ते पालेबारसा रोड वरील आसोलामेंढा नहरामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली. #Death
     पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या या क्षेत्रात असोलामेंढा तलाव तसेच नहरावर पोहण्यास बंदी आहे. त्या दृष्टीने पाथरी चे ठाणेदार बन्सोड यांनी सुरक्षा ही लावली. मात्र याच असोलामेंढा नहराचा पालेबारसा परिसरातील ही घटना घडली. दुपारच्या सुमारास सोनू पितांबर सोरदे वय 23 वर्ष रा. बामणी जिल्हा गडचिरोली व सुरज नानाजी नेवारे वय 20 वर्ष रा.ज्ञपाथरी हे गेले होते. त्यात ते बुडाले. #Adharnewsnetwork
 या संदर्भात माहिती होताच पाथरीचे ठाणेदार बनसोड हे घटनास्थळी धाव घेतली. तसेच काही वेळानंतर त्या दोघांना बाहेर काढण्यात आले. त्या सर्वांना प्राथमिक स्वास्थ केंद्र पाथरी येथे नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टर नि मृत्यु घोषित केले. पुढील तपास पाथरी पोलीस करीत असून पाथरी येथील युवक सुरज नेवारे हा त्या बुडत्या युवकाला वाचविण्यासाठी नहरात उडी घेतला असे बोलल्या जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने