Top News

मोकाट जनावरांमुळे वाहन चालकांचे जीव धोक्‍यात. #Animals

मोकाट जनावरांवर नगरपालिकाने त्वरित नियंत्रण करावे- तालुकाध्यक्ष संतोष देरकर


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
राजुरा:- मोकाट जनावरांच्या झुंडींमुळे शहराच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वाहनचालकांचे जीव धोक्‍यात आले असून वर्षभरात अनेक अपघात झाले आहेत. अनेक प्राण्यांना जीवही गमवावा लागला आहे. मोकाट जनावरांना पकडणे, मालकांचा शोध घेण्याची मोहीम नगरपालिकेने हाती घेतलेली दिसुन येत नाही. त्यामुळे रस्त्यांवरील जनावरांमुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त आहे.#adharnewsnetwork
दरम्यान, मोकाट जनावरांसाठी केंद्र व राज्याने पारित केलेल्या कायद्याचीही नगरपालिकेने अंमलबजावणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष देरकर यांनी केली आहे. अनेक दिवसांपासून पाळीव मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढला असताना नगरपालिका आणि नगरसेवकांकडे या संदर्भात तक्रारींचा ओघ वाढला असून देखील कारवाई मात्र होताना दिसत नाही. शहरातील महामार्गावरील काही ठिकाणी जनावरांचे साम्राज्य असल्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी मोकाट जनावर रस्त्यावर आडवे आल्याने अनेक अपघात झाल्याचे चित्र समोर आलेले आहे. त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शहरातील विविध भागात जनावरांचा कळप नेहमीच रस्त्यावर उभा किंवा बसलेला असतो. सोबतच शहरातील प्रमुख भागात कुत्र्यांचा सुरू असणारा बिनधास्त वावर देखील दिसून येतो. त्यावर प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे होत आहे. "शहरात मोकाट जनावारांचा सुळसुळाट असून त्यावर नियंत्रणासाठी नगरपालिकेने कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुकाध्यक्ष संतोष देरकर यांनी दिला आहे.#Animals

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने