Top News

वाचनाने ज्ञान समृद्ध होते:- डॉ. सुधीर हुंगे. #Pombhurna


पोंभूर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा स्मृतिदिन दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोज सोमवार महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुशील कुमार पाठक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुधीर हुंगे आणि महाविद्यालयाचे शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डॉ. सुशील कुमार पाठक यांनी आपल्या मनोगतामध्ये वाचकाला त्याच प्रमाणे संशोधकाला त्याच्या संशोधन कार्यात ग्रंथालयाचा फार मोठा उपयोग होतो. उपभोक्त्याच्या ज्ञाना मध्ये भर पडते हे विचार त्यांनी व्यक्त केले.
त्याच प्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुधीर हुंगे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये ग्रंथालयाचे महत्त्व पटवून दिले त्याचप्रमाणे वाचनाने ज्ञान समृद्ध होते. हे समजावून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रमुख प्राध्यापक सतीश पिसे यांनी केले तर, संचालन श्री योगेश निमकर यांनी केले. तर पाहुण्यांचे आभार डॉ. वैशाली मुरकुटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने