Top News

सरिता सूर यांची शहर अध्यक्षपदी नियुक्ती. #Selection



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- येथील नगरसेविका तथा भद्रावती नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सरिता सूर यांची महिला काॅंग्रेसच्या शहर अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.#Adharnewsnetwork
भद्रावती येथे आयोजित भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्रातील सरपंचांचा सत्कार आणि कांग्रेस प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, खा.बाळूभाऊ धानोरकर, आ.प्रतिभाताई धानोरकर, आ.सुभाष धोटे, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.#Selection

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने