Top News

भद्रावती शहरात "संत शिरोमणी सावता माळी रय्यत बाजार" सुरू करा. #Bhadrawati

शेतकरी ते थेट ग्राहक विक्री या हि संकल्पना यातुन उदयास येईल.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनीधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती यांनी डॉ निलेश खटके तहसीलदार भद्रावती यांचे‌कडे निवेदना व्दारे मागणी केली.#adharnewsnetwork
शेतक-यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, शेतक-यांनी स्वत:चा माल शेतकरी बाजारात थेट ग्राहकाला विकावा. शेतकरी बांधवाला मालाची योग्य किंमत आणि ग्राहकाला रास्त भाव मिळावा यासाठी ग्राहक पंचायत भद्रावती यांनी तहसीलदार भद्रावती यांचे‌कडे निवेदन दिले.
महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या "पिकेल ते विकेल" या संकल्पनेवर आधारित "संत शिरोमणी सावता माळी रय्यत बाजार अभियान" सुरू करून शेतकरी ते थेट ग्राहक विक्री सुरू करावी. शेतातील उत्पादीत धान्य व भाजीपाला विक्री व्यवस्था करण्यासंबंधात बाजार तालूका स्थरावर शेतकरी व‌ शेतकरी गट या व्यवस्थेद्वारे थेट ग्राहकापर्यंत जोडावे. शेतक-याच्या मालाला योग्य मुल्य मिळवून देण्याकरिता नगरपालीका व ग्राम विकासातील विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे सोबतीने विक्री स्टाॅलची जागा निश्चीत करावी.
तसेच स्टाॅल लावण्याचे तारखा, दिवसाचे वेळपत्रक अंतीम करावे. जेणे करून शेतकरी, शेती उत्पादक संघ यांचा जास्तीत जास्त प्रतीसाद मिळेल आणी ग्राहकांना पण ताजी फळे, भाजीपाला आणी धान्य रास्त भावात मिळेल.
"पिकेल ते विकेल" या संकल्पनेवर आधारित "संत शिरोमणी सावता माळी रय्यत बाजार अभियान" याबाबत निलेश खटके तहसीलदार भद्रावती, सुर्यकांत पिदुरकर मुख्याधिकारी भद्रावती, पुरूषोत्तम कोमटी तालुका कृषी अधिकारी, हिवशे साहेब यांच्या सोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या चर्चेला ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष वामन नामपल्लीवार, संघटनमंत्री वसंत व-हाटे, सह सचिव प्रविण चिमुरकर, जिल्हा संघटनमंत्री पुरुषोत्तम मत्ते आणी कार्यकारी सदस्य सुदर्शन तनगुलवार यांची उपस्थिती होती.#Bhadrawati

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने