Top News

आम आदमी पार्टी, सीआयटीयु मार्क्सवादी काॅम्युनिस्ट पार्टी, संभाजी ब्रिगेड, रिपब्लिकन पार्टी यांनी "भारत बंद" च्या पार्श्वभूमीवर गांधी चौकात केली निदर्शने. #Chandrapur


चंद्रपुर:- शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी सुरू असलेल्या भाजप सरकारच्या हिंस्रपणाच्या विरोधात तसेच तात्काळ काळे कायदे रद्द करा या मागणीसाठी आज 27 सप्टेबर भारत बंद च्या दिवशी स्थानीक गांधी चौक येथे निदर्शने करण्यात आली जय भारत केंद्र सरकारने शेतकरी विरोधी व कॉर्पोरेट धार्जिणे कृषी कायदे मागे घ्यावेत व आधार भावाला कायदेशीर संरक्षण द्यावे या मागण्यांसाठी दिल्ली येथे आठ महिन्यापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेले शांततापूर्ण आंदोलन कुटीलपणे बदनाम करून मोडून काढण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे.

पण सरकारच्या या कारस्थानास शेतकऱ्यांचा जबरदस्त प्रतिकार होत आहे सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी आंदोलन मोडीत काढण्यासाठी हिंस्र व कुटील मार्गाचा अवलंब केला आहे, या हिंसक कृती च्या विरोधात देशातील सर्व शेतकरी संघटना तसेच विवीध पक्षानी आज भारत बंद पुकारला केंद्रातील काळे कायद्ये रद्द करा. अशी मागणी या प्रसंगी लाऊन धरण्यात आली. कोविड नियमाचे पालन करूण हे आंदोलन यशस्वी करण्यात आले.
आंदोलन यशस्वी करन्याकरीता आम आदमी पार्टी चे जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे कामगार नेते श्री. रमेशचंद्र दहीवडे श्री .गोडघाटे श्री कीशोर जामदार , राजेश पिंजरकर भिवराज सोनी जिल्हा कोषाध्यक्ष मयुर राईकवार जिल्हा युवा संयोजक सुनिल भोयर महानगर संघटनमंञी रवि पप्पुलवार बल्लारपुर शहर अध्यक्ष अमीत बोरकर घुग्गुस शहर अध्यक्ष सोनल पाटील भद्रावती शहर अध्यक्ष राजु कुडे शहर सचिव योगेश आपटे राजेश चेडगुलवार सिकंदर सागोरे आसीफ शेख अश्रफभाई चंदु माडुरवार वामनराव नंदुरकर रामदासजी पोटे प्रशांत गद्दाला सरीताताई शंकर धुमाळे अशोक आनंदे सागर बि-हाडे गणपत गेडाम तसेच आम आदमी पार्टी चंद्रपुर चे अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्ता उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने