🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून जिवती तहसील समोर नागपुर कराराची होळी. #Jivati

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- २८ सप्टेंबर १९५३ चा नागपूर करार आज विदर्भवाद्यांनी केली होळी नागपूर कराराची जिवती येथे सुदाम राठोड यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक २८/०९/२०२१ ला जिवती तहसील कार्यालयासमोर नागपूर कराराची होळी करून विदर्भवाद्यांनी नागपूर कराराचा निषेध दर्शविला. आणि स्वतंत्र विदर्भ राज्य झाले पाहिजे म्हणून नारेबाजी केली.

यावेळी उपस्थित विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुदाम राठोड, विशाल राठोड सोशल मीडिया अध्यक्ष चंद्रपूर, अरविंद चव्हाण जिवती तालुका अध्यक्ष,विनोद पवार शहर अध्यक्ष, शेतकरी संघटनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष निळकंठराव कोरांगे, देविदास वारे, उद्धव मुगावे, अशोक राठोड, करण चव्हाण,इस्माईल सय्यद,लक्ष्मण श्रीमंगल सायसराव कुंडगिर व विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत