जिल्ह्यातील विविध ठिकाणी भिम आर्मीच्या शाखा गठीत. #Appointment

Bhairav Diwase
गाव तिथे शाखा उपक्रम.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- चंद्रपूर जिल्हा भिम आर्मीच्या गाव तेथे शाखा या अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील विविध गावातील भिम आर्मीच्या शाखा गठीत करण्यात आल्या यावेळी भिम आर्मीचे जिल्हाअध्यक्ष शंकर मुन यांनी सर्व शाखा पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत संघटनेचे कार्य तळागळातील जनते पर्यंत पोहचविण्याचे आवाहन करीत सर्व शाखांना पुढीलवाटचाली बद्दल शुभेच्छा दिल्या.
🟥
जिल्ह्यातील आबमक्ता, खानगाव, वडगाव व गिरोला या गावात भिम आर्मीच्या शाखा गठीत करून नवे पदाधिकारी नियुक्ती करण्यात आले. या नवीन शाखा उघडण्यात आल्याने त्या भागात संघटनेचे कार्य अधिक बळकट होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
       🟥
     यावेळी भिम आर्मीचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष शंकर मुन, जिल्हा संघटक विजय गेडाम, भद्रावती भिम आर्मीचे तालुका अध्यक्ष अनवर भय्या, चिमूर येथील भिम आर्मीचे महासचिव जगदीश सिडाम आदींची उपस्थिती होती. 🟥