जाहिरात... Advertisement... विज्ञापन

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक. #Arrested #Debauchery


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- तालुक्यातील येथील एका १३ वर्षीय मुलीस आरोपी अनिल पिसे (२४) रा. कॉलरी हा मागील एक महिन्यापासून पाठलाग करून तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता.
दरम्यान आरोपी सदर मुलींला वारंवार मोबाईल क्रमांक मागत होता. पीडित मुलीने या बाबतची सदर माहिती आपल्या आईला सांगितली. पीडित मुलगी व तिची आई माजरी पोलीस स्टेशन गाठुन आरोपी अनिल पिसे याच्या विरुद्ध तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच माजरी पोलीसांनी आरोपीला तत्काळ अटक केली.
दरम्यान आरोपीला वरोरा येथील न्यायालयात हजर केले असता, त्यास १५ दिवसाची न्यायालयीन कोठडी मध्ये रवाना करण्यात आले.
याप्रकरणी अल्पवयीन मुलगी व तिच्या आईने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बालकांचे विनयभंग अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या कलमान्वये आरोपीविरोधात ३५४ (ड) भादवि, कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे, ठाणेदार विनित घागे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विद्या जाधव (वरोरा) हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत