Top News

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त सेवा दिवसाचा पाचवा दिवस.

केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये सातारा भोसले येथे आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत डोळे तपासणी शिबीर व चष्मे वाटप.
पोंभुर्णा:- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त सर्वत्र सेवा सप्ताह साजरा केला जात आहे. अशातच सेवा दिवसाचा आज  पाचवा दिवस सातारा भोसले येथे साजरा करण्यात आला

लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशान्वये केमारा-देवाडा जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सातारा येथे सातारा भोसले, सातारा कोमटी, सातारा तुकुम येथील राहुल संतोषवार यांच्या हस्ते २५७ नागरिकांची आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत डोळे तपासणी करून त्यांना चष्मे वाटप करण्यात आले.
यावेळी गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नैत्र चिकित्सा शिबिराचा लाभ घेतला. यावेळी उपस्थित सौ. शालीना सिडाम (सरपंच), प्रविण दादाजी पेंदोर (उपसरपंच) जयंत पिंपळशेंडे, डॉ.वडपल्लीवार, डॉ. खोब्रागडे मॅडम, डॉ. बावणे मॅडम, प्रशांत शिर्के, चंद्रशेखर झगडकर, पी.बि.ढोणे (आरोग्य सेवक), विनायक पुट्ठावार (ग्रा.प.पा.पु.कर्मचारी) श्री.कैलास पेंदोर (ग्रा.प.शिपाई), सचिन सिडाम (संगणक परीचालक), सौ. रजनी तोडासे (आशा सेविका) तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते.
देवाडा खुर्द येथे पंचायत समिती उपसभापती सौ. ज्योती परशुराम बुरांडे यांच्या उपस्थितीत जेष्ठांचा शाल, श्रीफळ, वाकिंग स्टिक काळी, सिहावलोकन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मंगेश माळे, शंकर टिकले, दयाळ निमसरकार, मोतीराम भडके, तुळशीराम बुरांडे, वेनुदास भासारकर, राहुल सातपुते, परशुराम बुरांडे, उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने