जाहिरात... Advertisement... विज्ञापन

दुचाकी चोरणारा कुख्यात चोर चंद्रपुर शहर पोलीसांच्या ताब्यात. Arrested

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपुर:- पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर येथे एकूण ४ गुन्हे दाखल असून अनुक्रमे अप क ७४८/२०२१ कलम ३७९ भादवि चा गुन्हा दिनांक १७/०९/२०२१ रोजी नोंद असुन फिर्यादी मेघशाम एकनाथ वरारकर, राहणार गोपालपुरी बालाजी वार्ड चंद्रपुर यांनी पोस्टे चंद्रपूर शहर येथे तोंडी रिपोर्ट दिली की. फिर्याली हे गांधी चौक येथे बँकेत गेले असता आरोपी नामे आरीफ गुलाम रसुल शेख वय ३७ राहणार घुटकाळा चौक चंद्रपुर यांला संशयावरून विचारपुस केली असता आरोपीने एकूण ५ दुचाकी मोटारसायकल चोरून नेल्याची कबुली दिली त्याचेकडून एकूण 5 दुचाकी वाहना सह एकूण २,२०,०००/- रु. चा माल आरोपीचे ताब्यातुन हस्तगत करण्यात आला आहे.

अश्या प्रकारे सदर अटक आरोपीकडुन एकूण ४ गुन्हे उघडकीस आणुन त्याने कडुन एकुण
५ दोनचाकी मोटारसायकल त्याची एकुण कि अ २,२०,०००/- रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदर कार्यवाही मा पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिलवंत नांदेडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सुधाकर अंभोरे यांचे नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघमारे, विजय कोरडे, सहाय्यक फौजदार दौलत चालखुरे, शरिफ शेख, विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, नायक पोलिस कॉन्स्टेबल जयंता चुनारकर, रामकिसन सानप, सचिन बोरकर, सतिश टोंगलकर, इमरान शेख, पोलिस शिपाई रूपेश रणदिवे, चेतन गज्जलवार, प्रमोद डोंगरे, सतीश राठोड, मपोशि रिना राडे यांनी केली
आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत