Top News

पोंभूर्ण्यात जबरानजोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन वंचितचे धरणे आंदोलन. #Pombhurna #Movement

तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन.
(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभूर्णा:- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदिवासी व गैर आदिवासी जबरानजोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन वंचितचे विदर्भ समन्वयक राजू झोडे यांच्या नेतृत्वाखाली ९ सप्टेंबरला पोंभूर्ण्यातील नगरपंचायत चौकात भव्य धरणे आंदोलन करून मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. #Pombhurna #Movement
पोंभूर्णा येथील नगरपंचायत चौकात झालेल्या आंदोलनात मार्गदर्शन करतांना राजू झोडे यांनी तीन पिढ्यांची जाचक अट रद्द करण्यात यावे , वनहक्क कायद्यानुसार आदिवासी-गैर आदिवासींना जमिनीचे पट्टे देण्यात यावे,वन विभागाचा शेतकऱ्यांवरचा वाढता अन्याय बंद करण्यात यावा,जबरानजोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा तात्काळ निपटारा करावा,वहिवाट झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या शेतात मुनाऱ्या टाकू नये या प्रमुख मागण्यांना घेऊन वंचितने धरणे आंदोलन केले. अनेक वर्षांपासून जबरानजोत शेतकरी आपली शेती कसत आहे.

मात्र शासनाने सेटेलाईट मॅपींग सातबारा या सबबीखाली शेतकऱ्यांच्या शेतीवर वनविभागाने कब्जा केला आहे. आज अनेक शेतकरी शेती गेल्याने हतबल झाले आहेत. सिमेंट कांक्रिटचे इमले उभे करणे म्हणजे विकास नसून शेतकऱ्यांच्या हितासाठी कायदे करणे हे विकास आहे . मात्र शासन व प्रशासनाने शेतकऱ्याच्या पोटावर लाथा मारून आम्ही विकास केलो म्हणतात.हे आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. जर जबरानजोत शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या शासन व प्रशासनाने मान्य केल्या नाहीत तर वंचीत आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी राजू झोडे यांनी निवेदनातून दिला . संबंधित मागण्यांचे निवेदन तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी वंचित चे विदर्भ समन्वयक राजू झोडे, जिल्हा उपाध्यक्ष श्यामकांत गेडाम ,जिल्हा सदस्य मधुकर उराडे, आय टी सेलचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख अविनाशकुमार वाळके, तालुका अध्यक्ष चंद्रहास ऊराडे , तालुका महासचिव रवि तेलसे , शहराध्यक्ष राजु खोब्रागडे , युवा अध्यक्ष अतुल वाकडे ,विजय दुर्गे,मंगल लाकडे,पराग ऊराडे, संतोष तेलसे,खुशाल वनकर,वंदेश तावाडे,रेकचंद चंदावार ,प्रशिक माणकर, निश्चल भसारकर,बालाजी मेश्राम, सत्कार फुलझेले व असंख्य जबराणज्योत शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने