जाहिरात... Advertisement... विज्ञापन

पंचायत समिती विस्तार अधिकाऱ्याविना गटविकास अधिकारी यांचे दुर्लक्ष. #Sindewahi


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिंदेवाही पंचायत समिती मागील अनेक दिवसापासून या ना त्या कारणाने चर्चेत असून गेल्या १५ दिवसापासून या पंचायत समितीला विस्तार अधिकारी ( पंचायत विभाग) नसल्याने नागरिकांना हेलपट्या खावे लागत असून पंचायत समिती मार्फत समायोजन करण्यासाठी वरिष्ठांना कोणताही पाठपुरावा केला नसल्याचे विदारक चित्र पुढे आले आहे. Sindewahi
सिंदेवाही पंचायत समिती मध्ये सध्या एकच विस्तार अधिकारी ( पंचायत विभागाचे ) कार्यरत होते. परंतु त्यांनी मागील १५ दिवसांपूर्वी ते वैद्यकीय रजेवर गेले. मात्र तेव्हापासून अन्य कोणाकडेही प्रभार दिला नसल्याने या पंचायत समितीचा गाडा कसा चालत आहे. अशी सर्वत्र चर्चा दिसून येत आहे. पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी हे पंचायत समितीचे विकासाचे महत्वाचे अधिकारी आहेत. गटविकास अधिकारी यांचेकडे जाणारी कोणतीही फाईल ही पंचायत विभागाच्या विस्तार अधिकारी यांचे मार्फत जात असते. ग्रामीण भागातील ग्राम सेवक हे सुद्धा आपल्या ग्राम पंचायत ची कोणतीही माहिती विस्तार अधिकारी यांचेकडे देत असतात. मात्र मागील १५ दिवसापासून या पंचायत समिती मध्ये विस्तार अधिकारी नसल्याने ग्राम सेवक कोणत्याही योजनांची माहिती कुठे देत असतील? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
     सिंदेवाही पंचायत समिती चार प्रभागात विभागली असून ५२ ग्राम पंचायत चा कारभार पाहण्यासाठी २ विस्तार अधिकारी (पंचायत विभाग) यांची नेमणूक झालेली आहे. कार्यरत असलेले एक विस्तार हे १५ दिवसापासून वैद्यकीय रजेवर आहेत, तर दुसरे नव्याने आलेले  १ तारखेला रुजू होऊन दुसऱ्या दिवशी ते वैद्यकीय रजेवर गेले असल्याने सिंदेवाही पंचायत समिती चा कारभार विस्तार अधिकाऱ्या वीणा झाला असून सबंधित गट विकास अधिकारी यांनी याबाबत कोणतीही दखल न घेता वरिष्ठ अधिकारी यांचेकडे समायोजन करण्यासाठी कोणताही पाठपुरावा केला नाही. त्यामुळे या पंचायत समितीचा भोंगळ कारभार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने पंचायत समितीला भेट दिली असता गट विकास अधिकारी यांचे सह अनेक कर्मचारी घराकडे गेले होते. काही मोजकेच कर्मचारी पंचायत समिती मध्ये हजर होते. सिंदेवाही तालुक्यातून जिल्हा परिषद मध्ये ४ लोकप्रतिनिधी पाठविले असून त्यांनी तरी आपल्या पंचायत समिती कडे लक्ष घालून त्वरित पंचायत विभागाच्या विस्तार अधिकारी यांची नेमणूक करावी, अशी सिंदेवाही  तालुक्यातून मागणी करण्यात येत आहे,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत