चंद्रपूर:- उद्या होणारी आरोग्य विभाग गट क व गट ड ची परीक्षा आज ऐन वेळेवर रद्द करून पुन्हा एकदा बिन डोक्याची सरकार म्हणून सिद्द केले. उद्या माझा कनिष्ठ लिपिक पदाचा पेपर नागपूर येथे होणार होता म्हणून वेळेवर पोहचता येईल म्हणून आजच मी नागपूर ला आलो.
आमच्या आई बाबांनी कष्ट करून गरीबीचे ओझं दूर करण्यासाठी आम्हाला स्पर्धा परीकक्षेत उतरविले आणि आज जाण्या येण्यासाठी जवळ पास ६०० रुपये खर्च करून नागपूर ला आलो. आज पेपर रद्द झाला म्हणून माहिती झाले. पण आता ते ६०० रुपये कोण परत देणार? ते सुद्धा आम्हाला सांगावे.