परभणी जिल्ह्यातील डिगोळ तांडा येथिल पिडीतांना न्याय द्या गोर सेनेकडुन जिल्हाधिकारी यांना निवेदन. #Chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- परभणी जिल्ह्यातील डिगोळ तांडा येथिल अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुण तिच्या मृत्युसाठी जबाबदार असणाऱ्या आरोपींना कठोर कारवाई करुण फाशीची शिक्षा द्या करिता गोर सेना जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर पंडीत भाऊ राठोड याच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
परभणी जिल्ह्यातील डिगोळ येथिल ईयत्ता अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत असणार्या उसतोड कामगाराच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने सामुहिक बलात्कार केल्याने पिडीतांनी विषप्राशन करुण मृत्युशी झुंज देणाऱ्या पिडीतांच शेवटी 21/09/21 ला मृत्यु झाल या प्रकरणातील आरोपीवर कायद्यान्व्हे गुन्हा दाखल करुन शिक्षा देण्याकरीता जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री ठाकरे साहेब उपमुख्यमंत्री पवार साहेब गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मालिक यांना निवेदन देण्यात आले यावेळी गोर सेना जिल्हाध्यक्ष मा. पंडित भाऊ राठोड सचिव बालाजी जाधव सह कोषाध्यक्ष अशोक जाधव पल्लेझरी तांडा अध्यक्ष रावसाहेब जाधव आदींची उपस्थिती होती.