🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

गर्वाचा स्पर्श नसलेली "प्रतिभा"; सौ.धानोरकरांच्या साधेपणाची चर्चा. #Chandrapur

✍️ गोविल प्रभाकर मेहरकुरे.
राजकारण हे समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे. मात्र राजकारणातील फार कमी माणसे राजकारणाकडे समाजकारणाचे माध्यम म्हणून बघतात हे दुदैव. दुसरे असे, मिळालेल्या प्रसिद्धीने,पदाने काही माणसे हूरळून जातात. पदाचा अहंकार ऐवढा वाढीस लागतो की, ज्या सामान्य कार्यकर्त्यामूळे खुर्ची मिळाली त्या कार्यकर्त्यांचा विसर होतो. अश्यात वरोरा विधानसभेचा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या साधेपणाची चर्चा होते.
आज दिवसभर एक फोटो समाज माध्यमात व्हायरल होत आहे. तो भद्रावती येथील शास्त्री नगरातील एका विकासात्मक कामाच्या भुमिपुजन सोहळ्यात आमदार प्रतिभाताई धानोरकर गेल्यात. यादरम्यान त्यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी खुर्ची आणली. मात्र तिथे वयस्कर महीला पदाधिकारी उभ्या दिसताच त्यांनी आपली खुर्ची त्या वयस्कर महीला पदाधिकार्याला दिली. अन स्वतः दगडावर बसल्यात.  प्रतिभाताई धानोरकरांची ही अतिशय सामान्य कृती. मात्र या कृतीतून त्यांचा मोठेपणा कार्यकर्त्यांना दिसला. त्यांचा साधेपणा कार्यकर्त्यांना भावला.
 प्रतिभाताईंचा साधेपणा याआधी अनेकांनी बघीतला.त्यांचा बोलण्यातून,कृतीतून कधीच सत्तेचा,पदाचा गर्व दिसला नाही. मी अनेकदा त्यांच्या सोबत शासकीय बैठकीत व इतर कार्यक्रमाच्या वेळी जात असतो.प्रतिभाताई आपल्या कृतीने उपस्थितांची हृदये जिंकत असतात.चंद्रपूर जिल्हाचा राजकारणात प्रतिभाताईंनी स्वताची ओळख निर्माण केली आहे.आणि आपल्या साधेपणाने जनतेची हृदये ते जिंकत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत