Top News

प्रत्येकाला शुद्ध आणि पुरेसं पिण्याचं पाणी हे प्राधान्याचं काम. #Water

४१ लक्ष निधीचा राष्ट्रीय पेयजल योजनेचे खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते लोकार्पण.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर : प्रत्येक गावा-गावात, घरा - घरात पाणी पोहोचवणं शक्य आहे. मात्र, त्यासाठी परिपूर्ण नियोजनाची आवश्यकता आहे. पाणी वापराची शिस्त लावायला हवी. याची सुरवात शालेय स्तरापासून जनजागृतीची गरज आहे. हे नीट केल्यास घराघरात पाणी पोहण्याच ध्येय आपण नक्कीच गाठू असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते पांझूर्णि येथे ४१ लक्ष निधीचा राष्ट्रीय पेयजल योजनेच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.#Adharnewsnetwork
             
    ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी या योजनेद्वारे प्रत्येक घराघरात पोहचण्यास मदत होणार आहे. मागील २० वर्षांपासून हे गाव पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचित होते. खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नाने या गावाला शुद्ध पाणी नळाद्वारे घरोघरी मिळणार आहे.   
 
     पांझूर्णि गावात जवळपास ४० लक्ष रूपयाचे पांदण रस्ते, सात लक्ष रुपयांचे ओपन जिम साहित्य तसेच ७ लक्ष रुपये बसस्थानक करीता देण्यात आले. तसेच विविध विकास निधीतून १ कोटी ५ लक्ष या गावाकरिता मंजूर करण्यात आले. 
     यावेळी पंचायत समिती सभापती रवींद्र धोपटे, पंचायत समिती उपसभापती संजीवनी भोयर, जिल्हा परिषद सदस्य सुनंदा जीवतोड, तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, सरपंच निर्मला दडमल, उपसरपंच अर्चना मोडक, साहेबराव ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य गजानन काळे, भरती काळे, मारोतराव गुडेकर यांची उपस्तिती होती. यावेळी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.#Water

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने