Top News

आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर..... #Datedeclared


मुंबई:- आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी मनस्ताप व्यक्त केला होता. आज दुपारी 2 ते 3 तास बैठक झाली त्यामध्ये 24 ऑक्टोबर गट "क" ची परीक्षा तर गट "ड" साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
राजेश टोपे यांनी यावेळी 9 दिवस आधी हॉलतिकीट दिले जाईल, अशी देखील माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका कुठलेही चुकीचे काम होऊ देणार नाही, असं म्हटलं. चुकीच्या गैर मार्गाचा अवलंब होणार नाही, असं काही असेल तर तातडीने पोलिसात तक्रार नोंदवा, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने